Jaidev Thackeray : जयदेव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनोखी भेट | पुढारी

Jaidev Thackeray : जयदेव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनोखी भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत: काढलेलं पूर्वाश्रमीची शिवसेनेच चिन्ह असलेलं शिवधनुष्य भेट म्हणून दिलं आहे. जयदेव ठाकरे यांच्या तृतीय पत्नी अनुराधा ठाकरे यांनी हे चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वर्षा निवासस्थानी स्वत: भेटून दिले आहे.

शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्याला जयदेव ठाकरेंची उपस्थिती

महाराष्ट्राच्या राजकारणाला अलिकडच्या महिन्यांमध्ये नाट्यमयरित्या अनेक बदल होत गेले. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडत गेली. शिवसेना कोणाची? पक्षचिन्ह कोणाच? दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार? यावरुन वाद वाढतचं गेला. शिंदे आणि ठाकरे हे दोन्ही गट पक्ष, पक्षचिन्ह, दसरा मेळाव्यावर दावा करु लागले. अखेर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाली. तर बीकेसीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा ठरला. दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन होवू लागला. यंदाचा दसरा मेळावा ५ ऑक्टोबरला झाला. दोन्ही गटाच्या मेळाव्याला अनेकांनी उपस्थिती (Jaidev Thackeray) लावली होती.  यावरूनही चर्चेला उधाण आलं होते.

Jaidev Thackeray : एकनाथराव माझ्या आवडीचे नेते

बीकेसी मधील शिंदे गटाच्‍या दसरा मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्‍यांनी एकनाथ शिंदे यांच्‍या भूमिकेचे समर्थन करत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. “एकनाथराव माझ्या आवडीचे नेते आहेत. अशा धडाडीचा माणसासाठी मी इथे आलो आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि आताचा मुख्यमंत्री असे दोघांचा इतिहास आपल्याकडे आहे. यांना एकटं सोडू नका. हा नेता खूप जिद्दीचा आहे. आता सगळं बरखास्त करा आणि राज्‍यात शिंदे राज्य आणा, असे आवाहन जयदेव ठाकरे यांनी या वेळी केले होते.

 

हेही वाचा

Back to top button