Rishi Sunak's Car Collection : पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांना मिळणार 'ही' सुरक्षित SUV कार; जाणून घ्या त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनबाबत | पुढारी

Rishi Sunak's Car Collection : पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांना मिळणार 'ही' सुरक्षित SUV कार; जाणून घ्या त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनबाबत

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋषी सुनक हे युकेचे पंतप्रधान बनल्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. किंग चार्ल्स III यांनी पुन्हा नव्याने सरकार स्थापन करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर मंगळवारी सुनक यांची यूकेचे ५७ वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती युकेचे पंतप्रधान बनण्याचा इतिहास सुनक यांनी रचला आहे. त्यामुळे सुनक यांची आता यशस्वी व्यक्तींपैकी एक अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांना एक विशेष अशी SUV कार देखील मिळणार आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या कार कलेक्शनबाबतही सध्या जोरदार चर्चा आहे. (Rishi Sunak’s car collection)

Rishi Sunak’s car collection:

सुनक हे सध्या युनायटेड किंगडममधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या २२२ व्या स्थानावर आहेत. बाजारपेठेत येणाऱ्या नव नव्या गाड्या स्वत:जवळ बाळगणाऱ्या अनेक व्यक्ती पहायला मिळतात. मात्र सुनक हे या लोकांमध्ये मोडत नाहीत. ते कार शौकीन नसून देखील त्यांनी अनेक महागड्या कारचे कलेक्शन केलेले आहे. या बातमीतून त्यांच्याकडील सर्व कारबाबत जाणून घेऊया.

Untitled design (92)

1. फोक्सवॅगन गोल्फ GTI

त्यांच्या कार कलेक्शन यादीतील पहिली कार फोक्सवॅगन गोल्फ GTI आहे. गोल्फ GTI ही युनायटेड किंगडममध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त आणि कॉम्पॅक्ट कारपैकी एक आहे. एका अहवालातील माहितीनुसार, लंडनमध्ये फिरण्यासाठी गोल्फ या कारचा जास्त वापर केला जातो.

कारच्या फिचर्सबाबत बोलायचे झाले तर, या कारचे इंजिन 2.0 लीटर TSI मोटरद्वारे सुसज्ज आहे. हे इंजिन 207 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. याच्या वेगाबाबत बोलायचे तर, 7 सेकंदात 0-100 मीटर पर्यंत धावू शकते आणि 240 किमी प्रतितास इतका आहे.

Untitled design (93)

2. जग्वार एक्सजे एल (Jaguar XJ L)

या यादीतील दुसरी कार आहे ती म्हणजे Jaguar XJ L. ही एक अल्ट्रा-लक्झरी आलिशान अशी सेडान कार आहे. या कारच्या सुरक्षिततेबाबतच्या फिचर्स खूप प्रसिद्ध आहेत. या सेडानमधील प्रवाशांच्या संरक्षणासाठी केव्हलर (Kevlar) आणि टायटॅनियमची (Titanium) शीट बसवली आहे. तसेच यामध्ये एक पोर्टेबल ऑक्सिजन टँक फिचर्स देखील होते. प्रवाशांना भूसुरुंगांपासून वाचवण्यासाठी फ्लोरिंगवर 13 मिमीची स्टील प्लेट लावली आहे, तसेच कारला वायुवीजन प्रणाली (ventilation system) फिचर्स देखील मिळते.

इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कार 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड V6 इंजिनद्वारे सुसज्ज आहे. हे इंजिन 225 bhp पॉवर निर्माण करते आणि सुमारे 4 सेकंदात 0-100 किमी/ताशी पोहोचू शकते.

Untitled design (94)

3. लँड रोव्हर डिस्कव्हरी

लँड रोव्हर डिस्कव्हरी ही ऋषी सुनक यांची आवडती लक्झरी आणि सक्षम एसयूव्ही कार आहे. ही SUV 3.0-लिटर V6 पेट्रोल इंजिनद्वारे सुसज्ज आहे. हे इंजिन G 335 bhp पॉवर आणि 450 Nm पीक इतका टॉर्क निर्माण करते. त्याचबरोबर या SUV मध्ये 3.0-लिटरचे डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे. हे इंजिन 254 bhp इतकी पॉवर आणि 600 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

Range Rover Sentinel Is A Mobile Fortress Now With More Power

4. लँड रोव्हर रेंज रोव्हर सेंटिनेल

सुनक यांच्या यादीतील शेवटची कार रेंज रोव्हर सेंटिनेल आहे. ही कार त्यांच्यासाठी सध्या खूप खास अशी कार आहे. कारण, युकेचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रेंज रोव्हर सेंटिनेल ही एसयूव्ही कार त्यांची अधिकृत कार म्हणून वापरली जाईल. बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात रेंज रोव्हरच्या या मॉडेलचा यूकेच्या पंतप्रधानांसाठी अधिकृत सवारी म्हणून समावेश करण्यात आला होता.

या SUV बद्दल बोलायचे झाले तर रेंज रोव्हर सेंटिनेल एक बुलेट-प्रूफ कार आहे. 7.62 मिमी इतक्या उच्च वेगाच्या आर्मर-पीयरिंग बुलेट, मल्टी-लॅमिनेटेड प्रायव्हसी ग्लास, 15 Kg TNT Blast आणि DM51 ग्रेनेडसह सुसज्ज असल्याने प्रचंड सुरक्षित देते.  इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, लँड रोव्हर रेंज रोव्हर सेंटिनेलमध्ये 5.0-लिटर सुपरचार्ज केलेले V8 इंजिन आहे. हे इंजिन 375 bhp पॉवर आणि 625 Nm टॉर्क निर्माण करते.

हेही वाचा

Back to top button