ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी | पुढारी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील शेती व शेतकऱ्यांची स्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसरकारकडे केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत. शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली. राज्यकर्त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती. परंतु अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, राज्यातील शेती व शेतकऱ्यांची स्थिती पाहता कृपया आपण ओला दुष्काळ जाहीर करावा. यासोबतच शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देखील देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशीही मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button