‘तुमच्या घासातला एक घास गरिबांसाठी’! बीड जिल्ह्यात अनाथांच्या दिवाळी फराळासाठी अनेकांचे सरसावले हात | पुढारी

‘तुमच्या घासातला एक घास गरिबांसाठी’! बीड जिल्ह्यात अनाथांच्या दिवाळी फराळासाठी अनेकांचे सरसावले हात

बीड; पुढारी वृत्तसेवा : तुमच्या घासातील एक घास अनाथांसाठी या उपक्रमा अंतर्गत केज तालुक्यातील साळेगांव येथे निराधारांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. यासाठी अनेक दानशूरांनी पुढाकार घेत त्यासाठी मदत केली.

साळेगाव (ता. केज) येथे सुमारे दहा ते बारा वर्षांपासून निराधार, परित्यक्ता, दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दिवाळी साजरी करता यावी, त्यांच्या घरातील लहान मुले आणि सदस्यांच्या तोंडात गोड अन्नाचे दोन घास जावेत यासाठी दानशूर आणि सहृदय व्यक्तींच्या मदतीने दिवाळी फराळ व किराणा सामान वाटपाचा उपक्रम राबविला जातो.

दि २५ ऑक्टोबर रोजी साळेगावातील २५ ते ३० कुटुंबांना पत्रकार गौतम बचुटे, जय जोगदंड, अक्षय वरपे, गजानन इंगळे यांनी घरपोहोच फराळाचे वाटप केले. या उपक्रमाने निराधार कुटुंबाच्या चेहऱ्यावरील फुलले हसू पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून संयजोकानी सर्व दानशूरांचे आभार व्यक्त केले आहे.

अगदी सातासमुद्रा पलिकडून आली मदत

या उपक्रमासाठी अरब अमिरातील शास्त्रज्ञ आणि गावचे सुपुत्र डॉ प्रसन्ना राऊत यांनी आपल्या दिवंगत आजी आजोबांच्या स्मरणार्थ भरीव मदत केली. तसेच भाजपचे दत्तात्रय धस, पेट्रोल पंप मालक राहुल देशमुख, चंदू चौरे, विनोद भांगे, ॲड. किशोर आरडकर, सतीश बचुटे, सतीश वरपे, गोविंद टोपे, सपोनि शंकर वाघमोडे, सपोनि दादासाहेब सिद्धे, पोनि पुरुषोत्तम चोबे, सपोनि संतोष मिसळे, मंगेश भोले, कुंडलिक सालपे, रामदास तपसे, जाधव, विजयराज आरकडे, राजू गुंजाळ, बालासाहेब ढाकणे, पुंडलिक पोपळघट, राम यादव, सोमनाथ कापरे यांच्यासह अनेकांनी मदत केली. त्यांचे कौतुक होत आहे.

Back to top button