Ban On PFI : मोठी बातमी! पीएफआयवर पाच वर्षांची बंदी | पुढारी

Ban On PFI : मोठी बातमी! पीएफआयवर पाच वर्षांची बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी कारवाया करणा-या संघटनांना आर्थिक फंड पुरवल्याचा ठपका असलेल्या पीएफआयवर  (PFI-Popular Front of India) गृह मंत्रालयाने पाच वर्षांची बंदी (Ban On PFI ) घातली आहे.  पीएफआयसोबतच आणखी ९ संघटनांवरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएफआयशी संबधित असलेल्यांवर कारवाया सुरु आहेत. बऱ्याच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. पीएफआयशी संबंधित बऱ्याचजणांना अटकही करण्यात आली आहे.

Ban On PFI : पीएफआयसह आणखी ९ संघटनांवर बंदी 

 
केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. त्याच बरोबर आणखी नऊ संघटनांवरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये  रिहॅब फाऊंडेशन, रिहॅब इंडिया फाऊंडेशन (RIF), एम्पावर इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI), ज्युनियर फ्रंट, ऑल इंडिया इमाम काऊन्सिल (AICC),  नॅशनल व्हुमन फ्रंट (NWF), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स संस्था (NCHRO) या नऊ संघटनांवर कारवाई करण्यात आली आहे

पीएफआय संघटना 

गेले काही दिवस पीएफआय संघटना चर्चेत आहे. पीएफआय संघटनेशी संबधितांवर कारवाया सुरु आहेत. केरळ, कर्नाटकमध्ये मोठे कार्यक्षेत्र असलेली  पीएफआय ही संघटना कट्टरतावादी विचारांची संघटना म्हणुन ओळखली जाते. देशातील जवळपास  24 राज्यांमध्ये या संघटनेची शाखा आहेत. महाराष्ट्रातील काही ठिकाणीही पीएफआय संघटना कार्यरत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button