Dhanashree Verma : युजवेंद्र चहलने पत्नी धनश्रीला दिल्या रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा (व्हिडिओ) | पुढारी

Dhanashree Verma : युजवेंद्र चहलने पत्नी धनश्रीला दिल्या रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने त्याची पत्नी धनश्री वर्माला रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओ पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आणि इंग्लंडचा कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरनेही कमेंट करत धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Dhanashree Verma)

भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या तिरुवनंतपुरममध्ये भारतीय संघासोबत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-२० सामना तिरुवनंतपुरम येथे रंगणार आहे यासाठी टीम इंडियासोबत युजवेंद्र चहल देखील तेथे पोहचला आहे. दरम्यान, चहलने पत्नी धनश्री वर्माला इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Dhanashree Verma)

चहलने व्हिडिओमध्ये अनेक फोटो एकत्र केले आहेत. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रत्येक वेळी सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. माझी सर्वात चांगली आणि नेहमीच प्रेमळ अशी पत्नी म्हणून तु मला मिळाल्याबद्दल मी खूप धन्य झालो आहे.  आज, उद्या आणि पुढील अनेक वर्षांसाठी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप प्रेम…

काही दिवसांपूर्वी धनश्रीवर झाली होती शस्रक्रिया

धनश्रीच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डान्सचा सराव करत असताना ती जखमी झाली होती. डान्सर असण्यासोबतच ती डॉक्टर (डेंटिस्ट) देखील आहे. धनश्रीने २०१४ मध्ये नवी मुंबई येथील डी.वाय पाटील कॉलेज मधून डेंटिस्टचे शिक्षण घेतले. मात्र, डॉक्टर होण्याऐवजी तिने फिटनेस ट्रेनर, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर बनणे पसंत केले.

धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. धनश्री वर्मा ही तिच्या नावाने चालणाऱ्या डान्स कंपनीचीही संस्थापक आहे. धनश्री वर्मा अनेक दिवसांपासून लेगस्पिनर युजवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. चहलने आपल्या पालकांना धनश्रीबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबांनी भेटून लग्नाला होकार दिला. पण, कुटुंबाशिवाय त्यांच्या नात्याबद्दल कोणालाच माहिती मिळाली नव्हती. यानंतर दोघेही विवाह बंधनात अडकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

dhanashree verma

हेही वाचा;

Back to top button