‘राष्ट्रीय खेळ दिन’ मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनीच का साजरा केला जातो

‘राष्ट्रीय खेळ दिन’ मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनीच का साजरा केला जातो

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज राष्ट्रीय खेळ दिन. खेळ हा माणसाच्या आयुष्यातील महत्वपूर्ण बाब असून, व्यक्तीच्या मानसिक आणि शारिरीक विकासासाठी त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ खेळत असतो. तो आवड म्हणून असो वा एक करिअर म्हणून असो. आज राष्ट्रीय खेळ दिन असून, जाणून घेवूया हा दिवस २९ ऑगस्टला का साजरा केला जातो.

२९ ऑगस्ट, राष्ट्रीय खेळ दिन

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन देशात राष्ट्रीय खेळ दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय क्रीडा संस्कृती समृद्ध करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अनेक दिग्गज लोक त्यांच्या खेळाचे चाहते होते. जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरलाही त्यांच्या हॉकीने भूरळ घातली होती.

१६ व्या वर्षी भारतीय सेनेमध्ये दाखल.

त्यांचे वडील सोमेश्वर हे भारतीय सेनेत होते. वडीलांप्रमाणेच ते भारतीय सेनेत दाखल झाले. तेथे त्यांच्या हॉकीला वेगळे वळण मिळाले. अल्पावधीतच त्यांनी आपल्या हॉकीने सर्वांची मने जिंकली. भारतीय सेनेतून ते मेजर पदावर असताना ते निवृत्त झाले.

ध्यानसिंहचे झाले ध्यानचंद

त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे १९०५ साली २९ ऑगस्ट रोजी झाला. ध्यानचंद यांच पूर्ण नाव ध्यानसिंह सोमेश्वर सिंह बैस. ते हॉकीचा सराव चंद्र प्रकाशात करत. हे पाहुन त्यांचे मित्र त्यांना 'चंद' म्हणू लागले. काही दिवसांनी 'चंद' चे ध्यानचंद झाले. हेच नाव पुढे रुढ झाले.

हॉकीचे जादुगार

मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२, १९३६ या साली सलग तीन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून विजय मिळवला. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या हॉकीच्या १९२६ ते १९४८ या कालावधीमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४०० पेक्षा अधिक गोल, तर पूर्ण करिअर मध्ये १००० च्यावर गोल केले.

द विझार्ड

पंजाबमधील झेलम येथील एका सामन्यात ध्यानचंद यांचा संघ २ गोलांनी पराभूत होत होता, तेव्हा ध्यानचंद यांनी शेवटच्या काही मिनिटांत ३ गोल करुन त्यांनी आश्चर्यरित्या ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हापासून त्यांना द विझार्ड हे नाव पडले.

मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला सर्वोच्च उंचीवर नेवून ठेवले आहे. हॉकीतील या जादुगाराच्या या अफाट कर्तुत्वाला राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त सलाम.

हे पाहिल का? महाराष्ट्राची गोधडी थेट विदेशात पोहचली .

logo
Pudhari News
pudhari.news