भाविना पटेलने इतिहास रचला! टोकियो पॅरालिम्‍पिकमध्ये रौप्यपदकाला गवसणी! | पुढारी

भाविना पटेलने इतिहास रचला! टोकियो पॅरालिम्‍पिकमध्ये रौप्यपदकाला गवसणी!

टोकियो 2020 पॅरालिम्पिक : भाविना पटेलने इतिहास रचला : भारताच्या भाविना पटेलने टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये इतिहास रचला आहे. भाविना पटेल तिच्या पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी झाली. पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. भाविनाला सुवर्ण जिंकण्याची संधी असली तरी अंतिम फेरीत चीनच्या यिंगने तिला सरळ गेममध्ये पराभूत केले.

१९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात, भाविना पटेल जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या यिंगला कडवी स्पर्धा देऊ शकली नाही. यिंगने पहिल्या गेमपासून भाविनावर दबाव आणला. यिंगने पहिला गेम 11-7 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये यिंगची कामगिरी आणखी नेत्रदीपक होती आणि तिने दुसरा गेम 11-5 ने जिंकला. तिसऱ्या गेमच्या सुरुवातीला भाविनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण यिंगने तिसरा गेम 11-6 ने जिंकला आणि ती जगातील नंबर वन खेळाडू का आहे हे दाखवून दिले.

भावना पटेलचा शानदार प्रवास

भाविना पटेलचा टोकियो पॅरालिम्पिकमधील प्रवास अतिशय नेत्रदीपक होता. भाविना पटेलने तिच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असलेल्या भाविना पटेल मोठ्या खेळाडूंना पराभूत करून पुढे गेली.

उपांत्यपूर्व फेरीत भाविना पटेलने 8 व्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव केला.

उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत भाविना पटेलने कमाल केली होती. भाविना पटेलने उपांत्यपूर्व फेरीत रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि नंबर दोन खेळाडूचा पराभव केला.

उपांत्य फेरीत चीनच्या स्टार खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पराभूत होऊन भाविनाने भारतासाठी रौप्यपदक निश्चित केले होते.

हे ही वाचलं का?

Back to top button