26/11 Mumbai Attack : १३ वर्षे पूर्ण; दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम

mumbai 26/11 attack
mumbai 26/11 attack
Published on
Updated on

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या 13 वर्षांनंतरही शहरावरील दहशतवादाचे सावट कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

समुद्रमार्गे आलेल्या 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मायानगरी मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये 34 विदेशी नागरिकांसह एकूण 166 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. सुमारे 700 जण जखमी झाले होते. पोलीस व जवानांनी हा हल्ला परतवून लावत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालून अजमल कसाब या आतिरेक्याला जिवंत पकडले. पुढे त्याला फासवर चढवण्यात तपास यंत्रणांना यश आले. या हल्ल्यात 18 पोलीस जवानांना वीरमरण आले.

मुंबईवर करण्यात आलेल्या या दहशतवादी हल्ल्याला शुक्रवारी 13 वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई पोलीस जिमखान्यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, कामा हॉस्पीटल, नरिमन हाऊस, हॉटेल ताज, हुतात्मा स्मारक, गेट वे ऑफ इंडीया या ठिकाणांसह शहरातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालये, तसेच सामाजिक संस्थांकडून हल्ल्यातील शहीद जवानांना मानवंदना देण्यात येणार आहे.

हे प्रस्ताव कागदावरच

शिघ्रकृती दल, फोर्सवन, अत्याधुनीक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटिव्ही यंत्रणा आणि यंत्रसामुग्री या पोलीस दलाच्या जमेच्या बाजू असल्या तरी सागरी गस्त आणि सुरक्षेचा प्रश्न मात्र कायम आहे. सागरी पोलीस मुख्यालयासह हायस्पीड बोट आणि अन्य प्रस्ताव मात्र कागदावरच उरले आहेत.

26/11 नंतर मुंबई…

मुंबईवरील या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील एनएसजी कमांडोंच्या धर्तीवर मुंबईत शक्तीशाली अशा शिघ्रकृती दल आणि फोर्सवनची स्थापना करण्यात आली आहे. अतिरेकी हल्ला परतवून लावण्याचा नियमित सराव या पथकांकडून करण्यात येतो. तसेच मुंबई पोलीस दलाला अत्याधुनीक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटिव्ही यंत्रणा आणि यंत्रसामुग्रीने सज्ज करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनीही विशेष पथके स्थापन करुन शहरातील संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवत केंद्रीय गुप्तचर आणि राज्यातील अन्य तपास यंत्रणांशीही समन्वय कायम ठेवला आहे.

हे वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news