युक्रेन : सर्वात सुंदर महिलांचा देश’ | पुढारी

युक्रेन : सर्वात सुंदर महिलांचा देश’

कीव : काही देशांबाबत वेगळ्याच धारणाही असू शकतात. सर्वात कष्टाळू, दीर्घायुष्यी किंवा आनंदी वगैरे अनेक प्रकारच्या लोकांचा देश म्हणून काही देशांची ओळख असू शकते. अशाच प्रकारे युक्रेन या देशाचीही एक वेगळी ओळख आहे. हा देश ‘सर्वात सुंदर महिलांचा देश’ म्हणून ओळखला जातो.

सहा लाख चौरस किलोमीटरपेक्षाही अधिक क्षेत्रफळ असलेल्या या देशामध्ये बहुतांश महिला अतिशय सुंदर असल्याचे म्हटले जाते. त्यामध्येही युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरातील महिलांच्या सौंदर्याची तर वारेमाप तारीफ केली जाते. हे शहर केवळ मानवी सौंर्यासाठीच नव्हे तर निसर्गसौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.

जणू काही सौंदर्याची खाण किंवा स्वर्गच असल्याचे या शहराबाबत म्हटले जाते. त्यामुळेच जगभरातील पर्यटकांना कीव शहराला भेट देण्याची इच्छा असते. युक्रेन हा जगातील जुन्या देशांपैकी एक आहे. तिथे जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट असलेली सात ठिकाणे आहेत.

मात्र तेथील सौंदर्य, रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख यांचे एक वेगळे वैशिष्ट आहे. 1932-33 मध्ये युक्रेनमध्ये भयानक दुष्काळ पडला होता. त्यावेळी हा देश रशियाचा एक भाग होता. या दुष्काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला. हा काळ वगळता एकंदरीतच हा देश खुशहाल आणि सुंदरच बनून राहिलेला आहे.

Back to top button