Israel Hamas War News | इस्रायल- हमास युद्धात आतापर्यंत २२ पत्रकारांचा मृत्यू

Israel Hamas War News | इस्रायल- हमास युद्धात आतापर्यंत २२ पत्रकारांचा मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : इस्रायल- हमास यांच्यातील संघर्षादरम्यान आतापर्यंत २२ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सच्या (CPJ) म्हणण्यानुसार, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत किमान २२ पत्रकार मारले गेले आहेत. यामध्ये १८ पॅलेस्टिनी, ३ इस्रायली आणि एक लेबनीज पत्रकाराचा समावेश आहे, असे समितीने एका निवेदनात म्हटले आहे. (Israel Hamas War News)

संबंधित बातम्या

यातील १५ पत्रकारांचा मृत्यू इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान झाले आहेत. तर दक्षिण इस्रायलमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यांत दोन पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे. आठ पत्रकार जखमी झाले आहेत. तिघे पत्रकार बेपत्ता आहेत अथवा त्यांना ताब्यात घेण्यात आले असावे, असे सीपीजीने म्हटले आहे.

"पत्रकार हे संकटकाळात महत्त्वाचे काम करणारे नागरीक आहेत आणि त्यांना युद्ध करणाऱ्या गटांनी लक्ष्य करु नये," असेCPJ च्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

रस्त्यावर महिलेचा आक्राश

पॅलेस्टिनी पत्रकार हानी अबोरेझक यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यात इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात गाझामधील बहीण आणि मुलाचा मृत्यू झाल्यानंतर एक पॅलेस्टिनी महिला रस्त्यावर आक्रोश करताना दिसत आहे. आपल्या लोकांना क्रूरपणे मारल्याचे ती सांगते. यात निष्पाप जीवाचा काय दोष? हे तर नवजात बाळ आहे… त्यांनी आपला जीव गमावला," असे ती रडत सांगत आहे.

४,१३७ पॅलेस्टिनी ठार

गाझावरील इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत ४,१३७ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये १,४०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. दरम्यान, इस्त्राईलने काल रात्रभर बॉम्बफेक मोहीम सुरू ठेवल्यामुळे आणखी सुमारे ३० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. (Israel Hamas War News)

UNRWA च्या १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

युनायटेड नेशन्स एजन्सी फॉर पॅलेस्टिनी रिफ्युजी (UNRWA) ने म्हटले आहे की त्यांचे किमान १७ कर्मचारी युद्धात मारले गेले आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. "आजपर्यंत या भयंकर युद्धात आमचे १७ सहकारी मारले गेल्याची पुष्टी झाली आहे. हे सांगताना अंत्यत दुःख होत आहे की प्रत्यक्षात मृतांचा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे," असे UNRWA ने एका निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news