Israel Hamas War : हमासने दोन अमेरिकन ओलिसांची केली सुटका; अमेरिकेने मध्यस्थीसाठी कतारचे मानले आभार

Israel Hamas War : हमासने दोन अमेरिकन ओलिसांची केली सुटका; अमेरिकेने मध्यस्थीसाठी कतारचे मानले आभार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने दोन ओलीसांची सुटका केली आहे. या दोघी अमेरिकन आई आणि मुलगी आहेत. इव्हान्स्टन, इलिनॉय, यूएसए येथील रहिवासी असलेल्या आई आणि मुलगी या दोघींकडेही इस्रायलचे नागरिकत्व आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी हमासच्या कैदेतून मुक्त झालेल्या अमेरिकनांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

संबंधित बातम्या : 

हमासच्या लष्करी विंग अल-कसाम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कतारच्या मध्यस्थीनंतर दोघींना मानवतावादी आधारावर सोडण्यात आले आहे. ओलीसांची सुटका करून आम्ही अमेरिकन लोकांना आणि जगाला सांगू इच्छितो की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेले दावे खोटे आणि निराधार आहेत.

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने ज्युडिथ ताई रानन आणि नताली शोशाना रानन यांची हमासमधून सुटका केल्याची पुष्टी केली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना इस्रायलमधील लष्करी तळावर नेण्यात आले आहे. तिथे त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर इतर ओलीसांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून उर्वरित ओलीसांचीही सुटका करण्याचे आवाहन केले आहे.

बायडेन यांनी आई आणि मुलीशी साधला संवाद

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हमासने सोडलेल्या आई आणि मुलीशी फोनवर बोलून त्यांना मदतीचे आश्वासन दिले. "हमासने ओलीस ठेवल्यानंतर सोडण्यात आलेल्या दोन अमेरिकन नागरिकांशी मी नुकतेच बोललो," असे अध्यक्ष बायडेन यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे. अमेरिकन सरकार त्यांना पूर्ण मदत करेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

अमेरिकेने कतार सरकारचे आभार मानले

ओलिसांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी कतार सरकारचे आभार मानले. ब्लिंकेन म्हणाले की, इस्रायलमधील अमेरिकन दूतावासाची टीम लवकरच दोन अमेरिकन ओलिसांना भेटेल. शिकागोमधील आई आणि मुलगी, ज्यांना इस्रायलमधून हमासने ७ ऑक्टोबर रोजी ओलिस घेतले होते. ते म्हणाले की, १० अमेरिकन नागरिकांसह अनेक देशांतील सुमारे २०० इतर ओलीस अजूनही ठेवण्यात आले आहेत. हमासने सर्व ओलीस सोडले पाहिजेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news