Israel-Hamas War : इस्‍त्रायलने बॉम्‍बफेक थांबवावी, सर्व ओलिसांची सुटका करु : ‘हमास’ची नरमाईची भाषा!

सलग बाराव्‍या दिवशी इस्‍त्रायल आणि हमासमधील रक्‍तरंजित सुरु राहिला आहे.
सलग बाराव्‍या दिवशी इस्‍त्रायल आणि हमासमधील रक्‍तरंजित सुरु राहिला आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍त्रायलवर भीषण हल्‍ला करुन युद्धास कारणीभूत ठरलेल्‍या दहशतवादी संघटना हमासने आता नरमाईची भाषा सुरु केली आहे. इस्रायली सैन्याने गाझावर बॉम्बफेक करणे थांबवल्यास सर्व ओलीस सोडण्यास तयार असल्‍याचे 'हमास'ने म्‍हटले असल्‍याचे वृत्त 'एनबीसी' न्यूजने दिले आहे.

दहशतवादी संघटना हमासच्‍या म्‍होरक्‍याने एनसीबी न्‍यूजशी बोलताना म्‍हटले आहे की, "इस्रायलने गाझा शहरातील बॉम्‍बफेक पूर्णपणे थांबवल्‍यानंतर एका तासाच्या आत आम्‍ही सर्व ओलीस नागरिकांची सुटका करु. मंगळवारी मध्‍यरात्री गाझा सिटी हॉस्पिटलमध्ये हवाई हल्ल्यात शेकडो नागरिक ठार झाले आहेत. यानंतर  हमासने हा प्रस्‍ताव ठेवला आहे.

गाझा रुग्णालयावरील हल्ल्याची जबाबदारी इस्रायलच्या लष्कराने नाकारली आहे. हा हल्‍ला पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद लष्करी गटाने केल्‍याचा दावा केला आहे. हॉस्पिटलवरील हल्‍ल्‍यात सुमारे ३०० लोक ठार झाले. तर गाझा आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, या हल्‍ल्‍यात सुमारे ५०० नागरिक ठार झाले आहेत. पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी या प्राणघातक हवाई हल्ल्यानंतर देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

 हमासने शनिवार ७ ऑक्‍टोबर रोजी इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला केला. याला इस्‍त्रायलनेही चोख प्रत्युत्तर दिले, दोन्ही बाजूंमधील रक्तरंजित लढाईत आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. मंगळवारी हमासच्या दहशतवाद्यांनी दिलेल्‍या निवेदनानुसार, सुमारे 200-250 इस्‍त्रायल नागरिकांनी ओलीस ठेवले आहे. यामध्‍ये अन्‍य काही देशांच्‍या नागरिकांचाही समावेश आहे. ओलीस ठेवलेल्‍या नागरिकांवर सुरु असणार्‍या अत्‍याचाराचे व्‍हिडिओ ही व्‍हायरल झाले आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमाससोबत युद्ध सुरू केल्यापासून ओलिसांची सुटका करण्यास प्राधान्य दिले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी तेल अवीवमध्ये बेंजामिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ओलीस नागरिकांची सुटका करावी, असे आवाहन केले होते. इस्रायलने गाझावर संपूर्ण नाकेबंदी लादल्यानंतर, पाणी, इंधन, वीज आणि वैद्यकीय पुरवठा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यासह सर्व नागरी ओलिसांना सोडण्याची हमासने तयारी दर्शवली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news