पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) च्या सदस्यांनी इस्रायलवर तेल बंदी आणि इतर निर्बंध लादले पाहिजेत आणि सर्व इस्रायली राजदूतांची हकालपट्टी करावी, असे आवाहन इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियन यांनी बुधवारी (दि. १८) केली.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १८) उशिरा गाझा हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी ठार झाले. या हल्ल्यामुळे इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षात वाढ झाली. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी जेद्दाह या सौदी शहरात ओआयसीची आज (दि. १८) तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकी दरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन दिले आहे. या निवेदनात इस्त्रायल विरोधी भुमिका दर्शविण्यात आली.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, झिओनिस्ट राजवटीशी संबंध प्रस्थापित झाल्यास इस्रायली राजदूतांची हकालपट्टी करण्याव्यतिरिक्त, तेल निर्बंधांसह इस्लामिक देशांद्वारे इस्रायलवर त्वरित आणि संपूर्ण निर्बंध घालण्याची मागणी परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.