
महाड; पुढारी ऑनलाईन: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई- उटबर या गाडीला केंबुर्ली गावाच्या हद्दीत समोरून येणाऱ्या माेटारीने धडक दिली. या अपघातात माेटारीतील पाच जणांना गंभीर जखमी झाले. त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात ग्रामीण रुग्णालय व एसटी आगार व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई डेपोतून कोकणातील उटबर या ठिकाणी जाणाऱ्या एसटी गाडीला (क्रमांक एमएच २० बीएल ३५२६ ) केंबुर्ली गावाच्या हद्दीतील हॉटेल सिद्धेशजवळ समोरून येणाऱ्या माेटारीने (क्रमांक एमएच झीरो एकबीयू ३८११) जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले.
ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जखमी हे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. यामध्ये गुणाजी रत्नू लिगम (वय ७५), आराध्य सचिन लिगम (वय १३), अथर्व सचिन लिगम (वय ६), सचिन निकम (वय ३८) व सानिका सचिन निकम (वय ३५) यांचा समावेश आहे. सर्व जखमीवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.
मुंबई डेपोतून निघालेल्या मुंबई ऊटबर या गाडीचे चालक प्रवीण सूर्यभान शिरसम आणि वाहक बाबासाहेब खाडे असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचलंत का?