उत्पादनवाढीसाठी श्रीलंकेत बीजप्रक्रियेला सुरवात | पुढारी

उत्पादनवाढीसाठी श्रीलंकेत बीजप्रक्रियेला सुरवात

 कोपरगाव प्रतिनिधी :
उत्पादनवाढीसाठी भारतीय शेतकरी काय करतो याकडे जगाचे नेहमी लक्ष असते. कोणताही पूर्व अभ्यास आणि पूर्वतयारी नसताना श्रीलंकेतील राजपक्षे सरकारने सेंद्रिय शेतीचा निर्णय एप्रिल २००० मध्ये घेतला. आणि एक वर्षात तेथील शेती उत्पादन ४० ते ४५ टक्के कमी झाले त्यामुळे शेतकरी आणि तेथील अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाली. या परिस्थितीवर लक्ष ठेऊन मागील वर्षी अश्वमेध चे संशोधक तज्ञ डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी तेथील कृषी विभागातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि भारतात उत्पादनवाढीचे लक्ष टप्प्या टप्प्याने साध्य केले या दृष्टीकोनातून तेथिल पदाधिकाऱ्यांना माहिती अवगत केली. तसेच भविष्यात उत्पादन वाढीसाठी तेथे जीवाणू खते लागतील म्हणून उत्पादन प्रकल्प देखील पूर्ण केला . बीज प्रक्रिया आणि बायो फर्टिलायझर हा भारतीय शेतीचा उत्पादन वाढीचा महत्वाचा मुद्दा चर्चेत होता.
मागच्या एक वर्षाच्या श्रीलंकेमधील अभ्यासामध्ये बीजप्रक्रीयेमुळे २२ ते २५ टक्के उत्पादन वाढ शक्य असल्याचे डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी तेथील संशोधक, तज्ञ् ,प्रशासनातील अधिकारी आणि घटनात्मक दृष्टीने काम करणारे अधिकारी याना सांगितले होते व ते आता दाखवून दिले. त्यांनतर चालू हंगामात तेथे तेथिल नव्या सरकारने बिज प्रक्रिये संदर्भात विचार करून मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक करण्याचं काम हाती घेतलं आहे.
मागील वीस वर्षात भारतातील ज्या भागामध्ये शेतीचे उत्पादन कमी होत होते तिथे बिज प्रक्रिया करून उत्पादन वाढ होत आहे शेतकऱ्यांना तसा फायदा झाला आहे .
बिज प्रक्रियेमुळे प्रति हेक्टर रोपांची संख्या जितकी पाहिजे ते लक्ष्य साध्य होत आहे. बियाण्याची उगवणक्षमता वाढून पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढत आहे. खतांची उपलब्धता होत आहे. व कमी पाऊस असताना देखील चांगले उत्पादन मिळत आहे. त्यामुळे सोयाबिन , मका ,कपाशी यासारख्या पिकांमध्ये २० ते २५ टक्के वाढ दिसून येथे दिसत आहे. श्रीलंकेत जीवाणू खत या पूर्वी वापरत नव्हते त्यामुळे परिस्थिती वेगळी होते.तेथे जास्त आर्द्रता व बुरशी रोग या कारणाने ४५ टक्के उत्पादन घटीमध्ये रोपांची कमी उगवण क्षमता हि मुख्य समस्या असल्यामुळे उत्पादन घटत होते आणि त्यावर आता अंकुश येणार हे निश्चित आहे.
जेव्हा जेव्हा जागतिक शेती अडचणींमध्ये येते , तेव्हा तेव्हा तिथे भारतीय शेतीचे रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेऊन काम केले जाते . अगदी जर्मनी ,जपान ,चीन यांनी देखील भारतीय शेतीचे नेहमी कौतुक केले आहे. आज जागतिक उत्पादन हे घटत असून युद्धजन्य परिस्थिती मध्ये गहू ,कापूस ,सोयाबिन ,कांदा या पिकांची निर्यात भारत मोठ्या प्रमाणात करत आहे हि मोठी कौतुकाची बाब म्हणावी लागेल, आणि हे सर्व श्रेय येथील शेतकऱ्यांचे आहे. आणि त्यामुळे हे शक्य होत आहे. चालू वर्षी देखील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी जास्तीत जास्त बिज प्रक्रिया करून २० ते २५ टक्के उत्पादन लक्ष ठेवले पाहिजे या निमित्ताने अश्वमधे चे संशोधक डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे आणि शेतकऱ्यांना खरिफ हंगाम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button