
पुढारी ऑनलाईन डेस्क : मी तरुण वयातच शरद पवारांच्या प्रेमात पडलो. पवार हे थेट आहेत, अशी स्तुतीसुमने शिवसेना नेते संजय राऊत यांनी उधळली. ते पुणे येथील कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. '२०२४ नंतर ईडीच्या धाडीचे उत्तर देऊ. नोटीस न देता धाडी टाकल्या आणि माझी नसलेली पॉपर्टी जप्त केली. त्याच रात्री १२ वाजता मी केंद्रीय गृहमंत्री अनित शहा यांना फोन केला आणि मला अटक करा असे ठणकावून सांगितले'
तुम्ही भाजपसोबत गेला असता तर मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष संपली असती. आत्ता तुमची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे संपली, आता कसं वाटतंय? असा प्रश्न विचरला असता, राऊत यांनी आम्ही भाजपला फसवून सत्तेत आलो नाही. भाजपच्या वृत्तीचा मी अभ्यास केला. त्यांनी शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीचा हा प्रयोग देशात यशस्वी होईल, असे उत्तर दिले.