Modi Govt vs YouTube : मोदी सरकारचा युट्युब-ट्विटरला दणका, लैंगिक हिंसेला प्रोत्साहन देणारी ‘ती’ जाहिरात काढून टाकण्याचे आदेश

Modi Govt vs YouTube : मोदी सरकारचा युट्युब-ट्विटरला दणका, लैंगिक हिंसेला प्रोत्साहन देणारी ‘ती’ जाहिरात काढून टाकण्याचे आदेश
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटर (YouTube-Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मोठा आदेश जारी केला आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ब्रँडचे व्हिडिओ आपपल्या सोशल प्लॅटफॉर्मवरून काढून टाका, असे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) सांगितले आहे. या आदेशाचे एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. पीआयबीने (PIB) आपल्या ट्विटर अकौंटवरून ही माहिती दिली आहे. (Modi Govt vs YouTube)

पीआयबीच्या ट्विटमध्ये आहे की, हे व्हिडिओ सभ्यता आणि नैतिकतेच्या हितासाठी महिलांच्या चित्रणासाठी हानिकारक आहे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहितेचे उल्लंघन आहे. (Modi Govt vs YouTube)

जाहिरातीमुळे मोठा असंतोष

परफ्यूम ब्रँडच्या व्हिडिओने (shot perfume ad) सोशल मीडिया युझर्सच्या मोठ्या वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ही जाहिरात महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी असल्याचे सांगण्यात येत आहे. (Modi Govt vs YouTube)

एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, 'माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लक्षात आले आहे की सोशल मीडियावर परफ्यूमची अयोग्य आणि अपमानास्पद जाहिरात प्रसारित केली जात आहे. मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला या जाहिरातीचे सर्व व्हिडिओ त्वरित काढून टाकण्यास सांगितले आहे.' (Modi Govt vs YouTube)

ट्विटर आणि यूट्यूबला लिहिलेल्या पत्रात मंत्रालयाने म्हटले आहे की, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ला देखील हे व्हिडिओ त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. या कारणामुळे जाहिरातदाराला तत्काळ जाहिरात कढून टाकण्यास सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news