राशिभविष्य (दि. ३ जून २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. ३ जून २०२२)

राशिभविष्य

मेष- महत्त्वाची कामे पूर्वार्धात करावीत. मानसिकता बदलण्याची गरज. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. अनावश्यक भीतीमुळे नुकसान होण्याची शक्यता.

वृषभ- आप्तेष्टांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल. नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक उन्नती होईल.

मिथुन-दिवसाची सुरुवात शुभवार्तेने होईल. नियोजित कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. व्यावहारिक सावधानता आवश्यक.

कर्क- प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. खंबीरपणे लोकांच्या पाठीशी उभे राहाल. मित्रमंडळींबरोबरचे संबंध द़ृढ होतील. मनासारख्या घटना घडतील.

सिंह- अनावश्यक भीतीमुळे मनःस्ताप होईल. अस्वस्थता निर्माण करेल. प्रेमभाव, करुणा महत्त्वाची आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.

कन्या- व्यावसायिक प्रगती होईल. एकंदर योग्य मार्गाने वाटचाल कराल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

तूळ – आज कार्यसिद्धी योग. जबाबदारी वाढेल. पदोन्नतीचे योग. अशक्य काम शक्य कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. इच्छापूर्तीचा दिवस.

वृश्चिक-अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बचतीकडे लक्ष द्यावे लागेल. सरकार दप्तरी दंड भरावा लागू शकतो. नियमांचे पालन करावे.

धनु – एखाद्याला मदत करूनही तो कृतघ्नपणा करेल. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील. जुने आजार उद्भवतील. मनःस्वास्थ्य बिघडवणारा दिवस.

मकर – सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतील. यशाकडे वाटचाल कराल. सामंजस्य निर्माण होईल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल.

कुंभ – दिवस सार्थकी लागेल. जुने येणे वसूल होईल. लाभदायक दिवस. कामाची जबाबदारी वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
मीन- गुंतवणुकीस अयोग्य दिवस. सट्टा, लॉटरी, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रतिष्ठा पणाला लागेल.

Back to top button