
पुढारी ऑनलाईन डेस्क
सीबीआयने (CBI) देशातील सात शहरांमध्ये १४ विविध ठिकाणी छापे टाकत शोध मोहीम सुरू केली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट (CVPP) प्रकरणी ही कारवाई केली आहे. देशातील जम्मू, श्रीनगर, मुंबई, नोएडा, दिल्ली, तिरुवनंतपुरम (केरळ) आणि दरभंगा (बिहार) अशा वेगवेगळ्या १४ ठिकाणी छापेमारी करत CBI ने शोध मोहीम सुरू केली आहे.
चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट (CVPP) प्रकरणी सीबीआय पथकांनी गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरचे आयएएस अधिकारी आणि इतरांच्या घरावर छापे टाकले. CBI पथकाने IAS अधिकारी नवीन चौधरी (प्रधान सचिव, कृषी उत्पादन आणि शेतकरी कल्याण), चिनाब व्हॅली प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे माजी अधिकारी यांच्यावरही छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सीबीआयने नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंदर्भात छापे टाकले जात आहेत.