Laal Singh Chaddha : आमिरच्या चित्रपटाला दुसऱ्या दिवशीही थंड प्रतिसाद

laal singh chaddha
laal singh chaddha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खान आणि करीना कपूरचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) पुन्हा एकदा मागे पडला आहे. अपेक्षेपेक्षा कमी ओपनिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाला धक्का बसला आहे. जेव्हा चित्रपटाचे कलेक्शन घसरले, तेव्हादेखील बायकॉट लाल सिंह चड्ढा हा ट्रेंड ट्विटरवर सुरु होता. या चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्या दिवशी कलेक्शन्समध्ये जवळपास ३५ टक्के घसरण झाली. रक्षा बंधनचे औचित्य असतानाही मोठी ओपनिंग झाली नाही.  (Laal Singh Chaddha)

आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा हा त्या बॉलीवूड चित्रपटांपैकी एक आहे, ज्यांच्या आगमनाची चाहत्यांसह व्यापाराची प्रतीक्षा आहे. गेल्या काही वर्षांत आमिरचे चित्रपट ज्याप्रकारे गेम चेंजर मानले जात आहेत. प्रत्येकाला अपेक्षा होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करेल आणि फ्लॉप हिट इंडस्ट्रीला मोकळा श्वास देईल. पण, लालसिंग चड्ढा जेव्हा चित्रपटगृहात पोहोचला तेव्हा सर्व आशा धुळीला मिळाल्या. या चित्रपटाने केवळ ११.५० कोटींची ओपनिंग केली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २' या चित्रपटाची सुरुवातही चांगली झाली होती. कार्तिकच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १४ कोटींची कमाई केली होती.

आता दुसऱ्या दिवसाच्या संकलनाबाबतचे अहवालही उत्साहवर्धक नाहीत. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, लाल सिंग चड्ढा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३५ टक्क्यांनी घसरला आहे, म्हणजेच चित्रपटाचे नेट कलेक्शन ७ ते ९ कोटींच्या दरम्यान आहे. दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणांहून शो रद्द झाल्याच्या बातम्या येत राहिल्या. चित्रपटाच्या ओपनिंगला मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपटाच्या स्क्रीन्सची संख्याही १३०० पर्यंत कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दिल्ली आणि पंजाब सर्किटमध्ये या चित्रपटाने चांगली कामगिरी केली, परंतु इतरत्र प्रेक्षक मिळवण्यात तो अपयशी ठरला.

लालसिंग चड्ढासमोर अजूनही संधी आहे. सोमवार, १५ ऑगस्ट रोजी असल्याने लाँग वीकेंड मिळेल. या वीकेंडचा फायदा चित्रपट घेऊ शकतो का ते पाहूया. अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूडच्या फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. या चित्रपटात करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर शाहरुख खानने कॅमिओ केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news