सरकारी कामात अडथळा; दांपत्यावर गुन्हा

सरकारी कामात अडथळा; दांपत्यावर गुन्हा
Published on
Updated on

पिंपरी : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 10) निगडी पोलिस ठाण्यानजीक घडली. याप्रकरणी पोलिस शिपाई अमर जाधव यांनी गुरुवारी (दि. 11) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास भिसे (25), अश्विनी भिसे (19, दोघे रा. पांढरकरनगर, आकुर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे पोलिस शिपाई असून, निगडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान, गुरुवारी दुपारी ते कर्तव्यावर असताना आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली; तसेच फिर्यादी यांना ढकलून दिले. ज्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news