Jio, Airtel, Idea-Vodafone कडून बंपर प्लॅन ! वर्षाच्या मुदतीसह तब्बल ९०० जीबीपर्यंत डेटा !

Jio, Airtel, Idea-Vodafone कडून बंपर प्लॅन ! वर्षाच्या मुदतीसह तब्बल ९०० जीबीपर्यंत डेटा !
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

रिलायन्स जिओ ( Jio ), एअरटेल ( Airtel ) आणि आयडिया वोडाफोन या कंपन्या ग्राहकांसाठी दरवेळी विविध आणि आकर्षक प्लॅन्स घेऊन येतात. आता या कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करुन घेण्यासाठी वर्षभराचा मेगा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह तब्बल ९०० जीबी पर्यंतचा डाटा देऊ केला आहे. या शिवाय या कंपन्याद्वारे काही ओटीटी प्लॅटफॉर्मचे वर्षभराचे सबस्क्रिप्शन सुद्धा देण्यात आले आहे.

भारतामध्ये मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यामध्ये मोठी चढाओढ पहायला मिळत असते. या कंपन्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नवेनवे प्लॅन्स घेऊन येत असतात. ग्राहकांना कंपनीसोबत जोडून ठेवण्यासाठी ग्राहकांच्या सोईचे व त्यांना उपयोगी पडतील शिवाय त्यांच्या खिशाला देखिल परवडतील असे विशेष प्लॅन आणवे लागतात. या स्पर्धेत आपल्या ग्राहकांला संतुष्ट ठेवणे व नवे ग्राहक जोडण्यासाठी आजच्या ग्राहकांची मानसिकता पाहून बाजारात या कंपन्यांकडून नवे प्लॅन आणले जात असतात.

सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात देखिल इंटरनेट सर्वांकडून सहज वापरले जात आहे. या सर्वांना गृहित धरुन हे लाभ अधिकाअधिक ग्राहकांना देण्यासाठी रिलायन्स, एअरटेल आणि आयडिया वोडाफोन या कंपन्यांनी वर्षभराचा प्लॅन्सची ऑफरच ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

रिलायन्स जिओ ( Jio ) ने ग्राहकांसाठी वर्षभराच्या म्हणजे ३६५ दिवसांची वैधता असलेला प्लॅन आणला आहे. या २९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आलेला आहे. तसेच या अंतर्गत ग्राहकांना २.५ जीबी डेटा दररोज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. हा डेटा एकूण ९१२.५ इतका दिला जाणार आहे. शिवाय या प्लॅनमध्ये जिओने विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन उपलब्ध करुन दिले आहे.

एअरटेलने ( Airtel ) २९९९ रुपयांचा प्लॅन बाजारात आणला आहे. या मध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटा ग्राहकांना देऊ केला आहे. हा एकूण डेटा ७३० इतका होतो. शिवाय या प्लॅनमध्ये त्यांनी ग्राहकांना दररोज १०० एसएमएस देण्यात आलेले आहेत. शिवाय त्यांनी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे ३० दिवसांचे ट्रायल मेंबरशीप दिण्यात आलेली आहे.

आयडिया वोडाफोन (  IdeaVodafone ) या कंपनीने देखिल हा वर्षभराचा प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. ३६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनचा रिचार्ज ३०९९ रुपयांचा आहे. यामध्ये त्यांनी ग्राहकांसाठी दररोज १.५ जीबी डेटा दिला आहे. शिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देण्यात आले आहे. तसेच एका वर्षासाठी डिझ्ने हॉटस्टारचा मोफत सब्सक्रिप्शन देण्यात आला आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news