पुढारी ऑनलाईन डेस्क
मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. मनोरंजन विश्वात मागील ६ दशकांहून सक्रिय होत्या. रेखा कामत यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून काम केले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्या कलाविश्वास मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
रेखा कामत यांचे माहेरकडील नाव कुदुम सुखटणकर होते. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीचे रेखा कामत यांचं शालेय शिक्षम झाले होते. रेखा कामत यांनी कथ्थक आणि भरत नाट्याचे शिक्षण घेतले. इतकंच नाही तर भानुदास मानकामे व घोडके गुरुजीकडून गायनाचे धडे घेतले होते.
ऋणानुबंध, संगीत एकत प्याला, गंध निशिगंधाचा, गोष्ट जन्मांतरीची, तरूण तुर्क म्हातारे अर्क, तुझे आहे तुजपाशी, दिल्या घरी तू सुखी राहा, प्रेमाच्या गावा जावे, मला काही सांगायचे आहे, लग्नाची बेडी, सुंदर मी होणार, संगीत सौभद्र, अशी रेखा कामत यांची नाटकं गाजलेली आहे. त्याचबरोबर अगं बाई अरेच्चा, कुबेराचं धन, गृहदेवता, लाखाची गोष्ट या चित्रपटातील भूमिकाही त्यांच्या गाजल्या. त्याचबरोबर अनेक मराठी मालिकादेखील त्यांनी काम केले होते.