पैलवान सागरला मारण्यापूर्वी सुशिल कुमारने कुत्र्यांवर गोळ्या का झाडल्या? | पुढारी

पैलवान सागरला मारण्यापूर्वी सुशिल कुमारने कुत्र्यांवर गोळ्या का झाडल्या?

पुढारी ऑनलाईन डेस्क

पैलवान सागर धनखड यांच्या हत्ये प्रकरणी ऑलम्पिक मेडल विजेता सुशिल कुमार याच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. ५ मे २०२१ रोजी २७ वर्षाचे पैलवान सागर धनखड यांची हत्या छत्रसाल स्टेडियम मध्ये केली होती. पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी पैलवान सुशिल कुमार याला अटक केली होती. सुशिल कुमार काही दिवस फरारही होता.

सोमवारी १० जानेवारी रोजी याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सुशील कुमार घटनेच्या रात्री छत्रसाल स्टेडियममध्ये पोहोचला आणि त्याने कुत्र्यांवर गोळीबार केला. यानंतर त्याने स्टेडियममध्ये आधीच उपस्थित असलेल्या कुस्तीपटूंना बंदुकीच्या धाकावर धमकावले.

सुशीलचा सहकारी अनिल धीमान काय म्हणाला?

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहिणी न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात सुशील कुमारसह चार जणांना आरोपी करण्यात आले आहे. अनिल धीमान व इतरांच्या चौकशीत या लोकांची नावे पुढे आली होती. अनिल धीमान हे २०१९ पासून सुशील कुमारचे अंगरक्षक होते आणि सुशीलची खाजगी आणि अधिकृत कामेही ते पाहत होते.

धीमान याने सांगितले की, घटनेच्या रात्री धीमान सुशील कुमार सोबतच होता. घटने दिवशी सुशील कुमारने आपल्या अनेक सहकाऱ्यांना छत्रसाल स्टेडियमच्या बास्केटबॉल ग्राऊंडवर बालवले होते. त्याला तिथल्या काही लोकांना धडा शिकवायचा होता.

राहुलने आपला जबाब नोंदवला आहे. या जबाबबात अस म्हटलंय की, घटनेच्या रात्री तो स्वतः सुशील कुमारसोबत छत्रसाल स्टेडियमवर होता. सुशील कुमारकडे परवान्याची पिस्तूल होती. त्याच्यासोबत आणखी काही लोकही होते, जेव्हा तो स्टेडियममध्ये पोहोचला तेव्हा काही कुत्रे सुशील आणि त्याच्या साथीदारांवर भुंकत होते. यावेळी सुशीलला राग आला यानंतर त्याने कुत्र्यांवर गोळीबार केला.

यानंतर सुशीलने स्टेडियममध्ये आधीच उपस्थित असलेल्या कुस्तीपटू आणि प्रशिक्षकांना स्टेडियम मधून बाहेर जाण्यास सांगितले. पण पैलवान विकास या कुस्तीपटूने काय झाले’ असे विचारताच सुशीलने विकासला मारहाण करून त्याचा फोन हिसकावून घेतला. सुशीलने दुसऱ्या कुस्तीपटूचाही पाठलाग करून त्याला पकडले आणि ‘मी कुठे जाऊ, कोणाला भेटू, काय खातो, ही सर्व माहिती सागर आणि सोनू महलने लीक केली आहे. असं म्हणू लागला. राहुलच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान सुशील कुमारने दुसऱ्या कुस्तीपटूला पकडले आणि त्याच्याकडे फोन मागितला, त्याने तसे करण्यास नकार दिल्यावर सुशीलने त्याच्या कपाळावर पिस्तुलाने जोराने मारले.

हेही वाचलत का?

Back to top button