तेलंगणा, पुढारी ऑनलाईन
तेलंगणामध्ये अंगावर काटा आणणारी घटना नुकतीच घडली आहे. तेलंगणाच्या नलगौंडा गावातील एका रस्त्याच्या किनारी असलेल्या मंदिरातील देवीच्या पायाजवळ एका व्यक्तीचे कापलेलं शीर सापडलेलं आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना या निर्घृण हत्येचा शोध घेण्यासाठी आठ टीम तयार केल्या असून घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. (Telangana)
कालीमाता देवीच्या पायाजवळ एका अज्ञात व्यक्तीचे कापलेले शीर सापडलेले आहे. ही घटना नरबळीची असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून आणि परिसरातील लोकांकडून व्यक्त केला जात आहे. देवरकोंडाचे पोलीस उपधिक्षक (डीसीपी) आनंद रेड्डी म्हणाले की, "आम्हाला शंका आहे की, संबंधित व्यक्तीची दुसऱ्या ठिकाणी हत्या केली आहे आणि त्याचे शीर कापून देवीच्या पायाजवळ आणून ठेवले आहे."
"पोलीस सर्व बाजुंची या व्यक्तीच्या हत्येची चौकशी करत आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे वय ३० वर्षे आहे. व्यक्तीचे शीर सापडले असले तरी त्याचे धड अजून सापडलेले नाही. घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे", अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मंदिराच्या पुजाऱ्याने देवीच्या पायाखाली कापलेले शीर पाहून पोलिसांनी सांगितले त्यानंतर ही घटना समोर आली. (Telangana)
कालीमातेच्या पायाखाली पडलेले शीर, असा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनीदेखील व्यक्तीची ओळख व्हावी म्हणून फोटो शेअर केलेले आहेत. दरम्यान सूर्यापेट येथील एका कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधून सांगितले की, मृत व्यक्तीचा चेहरा हा ३० वर्षीय मानसिक आजार असलेल्या व्यक्तीशी मिळते आणि ही व्यक्ती दोन वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला होता.
पहा व्हिडिओ : मोराने दोस्ती शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही