Microsoft Global Outage: Microsoft युजर्सना मोठा दिलासा! २४ तासांनंतर Teams, Outlook अन् Copilot पुन्हा सुरु; कंपनीने समस्या कशी सोडवली?

Microsoft Global Outage: Downdetector वर तक्रारींचा आकडा जवळपास दोन लाखांवर पोहोचला होता. मायक्रोसॉफ्टने ग्राहकांची माफी मागितली आहे.
Microsoft Global Outage
Microsoft Global OutagePudhari
Published on: 
Updated on: 

Microsoft Global Outage: मायक्रोसॉफ्टच्या सेवा वापरणाऱ्या जगभरातील कोट्यवधी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल २४ तासांहून अधिक काळ ठप्प असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या महत्त्वाच्या सेवा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. Teams, Outlook, Copilot यांसह कंपनीच्या सेवा पूर्णपणे पूर्ववत झाल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील अनेक कंपन्या, सरकारी कार्यालये आणि सामान्य युजर्सचे कामकाज विस्कळीत झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ पासून मायक्रोसॉफ्टच्या विविध सेवांमध्ये अडचणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे युजर्सना ईमेल पाठवणे आणि मिळवणे, कॅलेंडर वापरणे तसेच ऑनलाइन मिटींगमध्ये सहभागी होणे कठीण झाले होते. विशेषतः कार्यालयीन कामासाठी Outlook आणि Teams वर अवलंबून असलेल्या कंपन्यांना मोठा फटका बसला. अनेक कर्मचाऱ्यांना महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करता आली नाहीत.

तक्रारींचा आकडा दोन लाखांच्या जवळ

मायक्रोसॉफ्टच्या या तांत्रिक बिघाडाची व्याप्ती किती मोठी होती, याचा अंदाज Downdetector या संकेतस्थळावरील तक्रारींवरून येतो. जगभरातील युजर्सनी मायक्रोसॉफ्टच्या विविध सेवांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या. न्यूयॉर्कच्या वेळेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तक्रारींचा आकडा जवळपास दोन लाखांवर पोहोचला होता.

Microsoft Global Outage
Gold Silver Price Today: सोन्याचे भाव अचानक कोसळले! खरेदीदारांसाठी मोठी बातमी, तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं?

यानंतर Outlook आणि Copilot संदर्भातील तक्रारींची संख्या काही प्रमाणात कमी झाली. मात्र, त्यामुळे सर्व सेवा लगेच पूर्ववत झाल्या नव्हत्या. काही युजर्सना आणखी काही काळ अडचणींचा सामना करावा लागला.

मायक्रोसॉफ्टने समस्या कशी सोडवली?

या समस्येवर मात करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने तांत्रिक पातळीवर अनेक उपाय केले. कंपनीने आपल्या नेटवर्कमधील अडचणी दूर केल्या. इंटरनेटवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नेटवर्क ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलं. तसेच सर्व्हरची क्षमता वाढवून संपूर्ण यंत्रणा स्थिर करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

Microsoft Global Outage
Couple Startup: लाखो रुपयांची आयटीची नोकरी सोडली, ९ महिन्यांत जोडप्याने उभा केला ५६ लाखांचा व्यवसाय; नेमकं काय केलं?

या उपायांनंतर प्रभावित सेवा पुन्हा सुरू करण्यात कंपनीला यश आले. आता Teams, Outlook, Copilot आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ मधील इतर सेवा सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांची माफी मागत मायक्रोसॉफ्टची पोस्ट

या आउटेजमुळे ग्राहक आणि भागीदारांना झालेल्या त्रासाबद्दल मायक्रोसॉफ्टने माफी मागितली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली. ग्राहकांचा मायक्रोसॉफ्टच्या सेवांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाची जबाबदारी कंपनी गांभीर्याने घेत आहे, असेही मायक्रोसॉफ्टने म्हटले. दरम्यान, या घटनेमुळे ईमेल, ऑनलाइन आणि इतर महत्त्वाची कामे काही काळासाठी थांबल्याने कंपन्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.