Iran Mock Donald Trump: तेलुगू चित्रपटातील क्लीप शेअर करून इराणनं डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचलं

झिम्बाब्वेमधील इराणच्या दूतावासाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्ध्वस्त करण्याच्या धमकीची उडवली खिल्ली
Iran Mock Donald Trump
Iran Mock Donald Trumppudhari
Published on
Updated on

Iran Mock Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयातून इराणाला नामशेष करण्याची धमकी दिली. ही धमकी इराणने फारशी मनावर न घेता उलट डोनाल्ड ट्रम्प यांचीच चेष्टा केली. डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचण्यासाठी इराणने तेलुगू चित्रपटातील एक फाईट सीनचा संदर्भ दिला.

Iran Mock Donald Trump
Donald Trump : "शांतता करार की संपूर्ण विनाश..."; ट्रम्प संयुक्त राष्ट्रांतील भाषणात इराणबाबत नेमकं काय म्‍हणाले?

झिम्बाब्वेमधील इराणच्या दूतावासाने एका तेलुगू चित्रपटातील क्लीप शेअर करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचा अन् पोकळ धमकीची थट्टा केली. इराणने ही क्लीप शेअर करत इराण आपल्या देशाचा बचाव करण्यासाठी सक्षम आहे असे सुचित केलं. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हॉलीवूड चित्रपट पाहण्यापेक्षा बॉलीवूड चित्रपट पहावेत असा सल्ला देखील दिला.

Iran Mock Donald Trump
Donald Trump : "भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले" : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ट्रम्प यांचा पुनरुच्चार

ते बॉलीवूड चित्रपट पाहत आहेत

झिम्बाब्वेमधील इराणच्या दूतावासाने एक ट्विट केलं, त्याला तेलुगू अभिनेता नंदमुरी बालकृष्णा यांच्या चित्रपटातील एक गंमतीशीर क्लीप जोडली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये इराण दूतावास म्हणते की, 'डोनाल्ड ट्रम्प इराणला नेस्तनाभूत करण्याची भाषा करतात. मात्र त्यांना माहिती आहे की इराणकडे भक्कम डिफेन्स आहे. आम्ही त्यांना कळवल्यापासून ते हॉलीवूड चित्रपट पाहण्याऐवजी बॉलीवूड चित्रपट पाहत आहेत.'

Iran Mock Donald Trump
US-Iran Tension | युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार? शांतता कराराच्या चर्चेत अडथळा

ट्रम्प यांची धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत इराणने शांतता करार केला नाही तर त्यांना नेस्तनाभूत करणार अशी धमकी दिली होती. संयुक्त राष्ट्रात एकादा देश असा उद्ध्वस्त करण्याची ही धमकी देणारे ट्रम्प हे पहिलेच राष्ट्र प्रमुख असावेत.

Iran Mock Donald Trump
Donald Trump | महासत्तेची मनमानी

डील किंवा नामशेष

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, 'मला आता मोठा निर्णय घ्यायचा आहे. इराणसोबत डील करायची की त्यांना उद्ध्वस्त करायचं आणि तो देश यापूर्वी कधी नव्हता इतका चांगला करायचा. हा देश कदाचित मध्य पूर्व आशियातील सर्वात चांगला देश किवा जगातील सर्वात चांगाल देश देखील होऊ शकतो.'

ट्रम्प पुढे म्हणाले की, 'नाहीतर मला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला उद्ध्वस्त करावं लागेल. ते त्वरित करावं लागेल. त्यांना लोकांना मारण्याची संधी न देता ते करावं लागेल.'

Iran Mock Donald Trump
Iran US war: इराण-अमेरिका चर्चेची तयारी: तेहरानने ठेवल्या ७ कडक अटी; ट्रम्प यांच्या धमक्यांचा काहीही परिणाम होणार नाही

राष्ट्रपती सभागृहाला संबोधित करणार

दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यात ३ तास चर्चा झाली. इराणचे राष्ट्रपती मोसुद पेझेश्कीयन न्यूयॉर्कला जाऊन आले असून ते सभागृहाला देखील संबोधित करणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटल्यापानंतर ते पहिल्यांदाच सभागृहाला संबोधित करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news