US-Iran Tension | युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार? शांतता कराराच्या चर्चेत अडथळा

अमेरिकेला इराणचा निर्वाणीचा इशारा
US-Iran Tension |
US-Iran Tension | युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार? शांतता कराराच्या चर्चेत अडथळा
Published on
Updated on

तेहरान/वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : पश्चिम आशियात अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत. शांतता करारावरील वाटाघाटी रखडल्या आहेत, या परिस्थितीत अमेरिकेने पुन्हा हल्ला केल्यास अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ले तीव्र केले जातील, असा इशारा इराणने दिला आहे.

अमेरिकेकडून इराणविरुद्ध नव्याने लष्करी कारवाईची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली असल्याचे इराणच्या केंद्रीय लष्करी कमांडने रविवारी म्हटले आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तत्पूर्वी इराणचे मुख्य प्रवक्ते मोहम्मद बाघर घालीबाफ यांनी, रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली ‘होर्मुझ खाडी’ पुन्हा सुरू करण्याबाबतच्या अटी इराणने मध्यस्थांमार्फत वॉशिंग्टनकडे सुपूर्द केल्या आहेत. असे सांगितले होते की, अमेरिकेने हल्ला केल्यास पश्चिम आशियातील अमेरिकेचे लष्करी तळ आणि हितसंबंधी केंद्रांवर तीव्र आणि दीर्घकाळ प्रतिहल्ले केले जातील, असा इशारा इराणच्या लष्कराने दिल्याचे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे.

इराणच्या सशस्त्र दलांचे समन्वय साधणाऱ्या 'खताम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर'ने एका निवेदनात म्हटले आहे की, झिओनिस्टांच्या खोट्या आणि भ्रामक कारवायांमागे जाऊन सुरू केलेल्या युद्धातील अपयशांवर पडदा पाडण्यासाठी आणि बनावट यश मिळवण्यासाठी, गुन्हेगार अमेरिकेने प्रादेशिक देशांच्या सहमतीने युरोपीय देशातील एका संयुक्त बैठकीत इराणविरुद्ध पुन्हा कारवाया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांना या कृत्यात भागीदार मानले जाईल आणि त्यांना शक्तिशाली इराणच्या सशस्त्र दलांकडून संयमाची अपेक्षा बाळगता येणार नाही, असा स्पष्ट दमही देण्यात आला आहे. यापूर्वी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख मोहसेन रेजाई यांनी, इराण कोणत्याही निर्णायक युद्धासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news