US Iran War
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari Photo

US Iran War | रक्तरंजित संघर्षाचा दहावा दिवस..! युद्धासाठी अमेरिका दररोज किती अब्ज डॉलर्सचा चुराडा करतोय?

प्रत्‍येक दिवसाला वाढणारा खर्च देशाच्‍या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण करण्‍याची शक्‍यता
Published on
Summary
  • अमेरिका करत आहे अत्यंत महागड्या क्षेपणास्त्रांचा वापर

  • हवाई मोहिमांचा दैनंदिन खर्च ३० दक्षलक्ष डॉलर

  • तीन लढाऊ विमाना पाडल्‍याने अमेरिकेचे मोठे नुकसान

US Iran War cost

वॉशिंग्‍टन : अमेरिका आणि इराणमधील युद्ध आज (दि. ९ मार्च) दहाव्‍या दिवशीही सुरूच आहे. अमेरिकेने केलेल्‍या हवाई हल्‍ल्‍यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि इतर वरिष्ठ नेते ठार झाले आहेत. तसेच इराणच्या शस्त्रसाठ्यावर जोरदार हल्ले करून त्यांचे मोठे नुकसानही केले आहे. दुसरीकडे इराणी नौदलाला पूर्णपणे हतबल केले आहे. युद्धाचा कालावधी वाढत असतानाला दर तासाला अमेरिकेला लाखो डॉलर्सचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे.

अमेरिकेतेने आतापर्यंत किती कोटींचा चुराडा केला?

या युद्धाच्या पहिल्या १०० तासांतच अमेरिकेने सुमारे $३.७ अब्ज (भारतीय चलनात अंदाजे ३१,००० कोटी रुपयांहून अधिक) खर्च केले आहेत.

US Iran War
US-Israel-Iran War Impact | "युद्धग्रस्त भागांत अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडिया आणि इंडिगोकडून अतिरिक्त विमानांची घोषणा"

पहिल्या १०० तासांतच अमेरिकेने खर्च केले ३.७ अब्ज डॉलर

अमेरिकन माध्यमांच्या रिपोर्टनुसार, इराणसोबतच्या या युद्धात अमेरिकेला दर तासाला सुमारे $३७.१ दशलक्ष (अंदाजे ३१० कोटी रुपये) खर्च करावा लागत आहे. 'द अटलांटिक' आणि 'CSIS' सारख्या संस्थांच्या अंदाजानुसार, या संघर्षाचा दैनंदिन खर्च $८९० दशलक्ष ते $१ अब्जच्या घरात पोहोचला असून, युद्धाच्या पहिल्या १०० तासांतच अमेरिकेने एकूण $३.७ अब्ज खर्च केले आहेत. या अवाढव्य खर्चामध्ये प्रत्यक्ष युद्ध मोहिमेचा खर्च, वापरलेला शस्त्रसाठा पुन्हा भरून काढणे आणि युद्धात झालेल्या पायाभूत सुविधांच्या नुकसानीची दुरुस्ती करणे यांसारख्या प्रमुख बाबींचा समावेश आहे.

US Iran War
US-Israel-Iran War : आखाती देशातून आतापर्यंत 2730 प्रवासी परतले!

अमेरिका करत आहे अत्यंत महागड्या क्षेपणास्त्रांचा वापर

इराणवर हल्ला करण्यासाठी आणि तिथून होणारे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला दररोज $७५० दशलक्ष (सुमारे ६,२०० कोटी रुपये) पेक्षा जास्त खर्च केवळ दारूगोळा आणि क्षेपणास्त्रे पुन्हा भरण्यासाठी करावा लागत आहे. विशेष म्हणजे, इराणकडून येणारी स्वस्त 'शाहिद ड्रोन' आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी अमेरिका अत्यंत महागड्या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. यामध्ये एका टोमाहॉक क्षेपणास्त्राची किंमत सुमारे $३.६ दशलक्ष, पॅट्रियट इंटरसेप्टरची किंमत $४ दशलक्ष, तर एका THAAD क्षेपणास्त्राची किंमत तब्बल $१२ दशलक्ष (सुमारे १०० कोटी रुपये) इतकी आहे.

US Iran War
Iran US war | "अमेरिकेशी चर्चा नाही..." : युद्धाबाबत दिवंगत खामेनींच्या वरिष्ठ सल्लागारांनी केले मोठे विधान

दररोजचा खर्च किती?

CSIS च्या अहवालानुसार, इराणविरुद्धच्या हवाई मोहिमेच्या पहिल्या १०० तासांत अमेरिकेने सुमारे $१२५.२ दशलक्ष (अंदाजे १,०४० कोटी रुपये) खर्च केले आहेत. सध्या या मोहिमेचा दैनंदिन खर्च किमान $३० दशलक्ष (अंदाजे २५० कोटी रुपये) ने वाढत आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात अमेरिकेची २०० हून अधिक लढाऊ विमाने तैनात आहेत. यामध्ये शत्रूच्या रडारवर न दिसणारी ५० 'स्टेल्थ' विमाने, ११० इतर लढाऊ विमाने आणि युद्धनौकांवरून उड्डाण करणारी ८० विमाने सतत कारवाया करत आहेत.

US Iran War
US - Iran War | युद्धाचा फटका, जेएनपीए बंदरात अडकले 1200 कंटेनर्स, सुमारे 300 कोटींचा निर्यात होणारा माल रखडला

तीन लढाऊ विमाना पाडल्‍याने अमेरिकेचे मोठे नुकसान

२ मार्च रोजी कुवेती हवाई संरक्षण दलाने चुकून अमेरिकेची तीन F-15E स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने पाडली, ज्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. १९९८ मध्ये एका विमानाची किंमत सुमारे $३१.१ दशलक्ष होती, मात्र २०२६ मध्ये एका विमानाची किंमत $८० ते $१०० दशलक्ष पर्यंत पोहोचली असून, ही तिन्ही विमाने बदलण्यासाठी अमेरिकेला एकूण $३०९ दशलक्ष (सुमारे २,६०० कोटी रुपये) खर्च करावे लागणार आहेत. समुद्रामध्ये तैनात असलेल्या यूएसएस अब्राहम लिंकन आणि यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड या दोन महाकाय विमानवाहू युद्धनौकांच्या केवळ रोजच्या देखभालीसाठी आणि कामकाजासाठी अमेरिकेला दररोज सुमारे $१५ दशलक्ष (अंदाजे १२५ कोटी रुपये) खर्च करावा लागत आहे.

US Iran War
India Iran Relations | इराणी जहाजाला भारताचा मदतीचा हात : परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांची संसदेत माहिती

अमेरिका-इराण युद्धाचा खर्च $९५ अब्जपर्यंत जाण्याची शक्यता

'पोलिटिको' (Politico) च्या रिपोर्टनुसार, इराणशी सुरू असलेल्या संघर्षात अमेरिका दररोज प्रचंड पैसा खर्च करत आहे. काही अमेरिकन संसद सदस्‍यांच्‍या मते हा खर्च आता दररोज २ अब्ज डॉलर (सुमारे १६,७०० कोटी रुपये) इतका अवाढव्य झाला आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील 'पेन व्हार्टन बजेट मॉडेल'च्या तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, हे युद्ध आणखी काही आठवडे सुरू राहिल्‍यास अमेरिकेचा थेट लष्करी खर्च $६५ अब्ज ते $९५ अब्ज (सुमारे ५.४ लाख कोटी ते ७.९ लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचू शकतो. हा खर्च अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण करणारा ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news