Iran US war | "अमेरिकेशी चर्चा नाही..." : युद्धाबाबत दिवंगत खामेनींच्या वरिष्ठ सल्लागारांनी केले मोठे विधान

Iran US war हल्‍ल्‍यांना प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी तीन मोठ्या मोहिमा राबवल्‍या
Iran US war
प्रातिनिधिक फोटो.Pudhari Photo
Published on
Updated on
Summary

इराणच्या लष्कराने (IRGC) स्‍पष्‍ट केले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Iran US war

तेहरान : अमेरिका इस्‍त्रालयने इराणविरोधात केलेल्‍या संयुक्‍त कारवाईचा आज (दि. ४) पाचवा दिवस आहे. आता इराणने आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. अमेरिकेबरोबरील चर्चेबाबत दिवंगत सर्वोच्च नेते आयतौल्ला अली खामेनी यांचे वरिष्ठ सल्लागार मोहम्मद मोखबर यांनी महत्त्‍वपूर्ण विधान केले आहे.

"युद्ध दीर्घकाळ सुरू... "

सरकारी टीव्‍हीशी बोलताना मोहम्मद मोखबर म्‍हणाले की, "इराणचा अमेरिकेसोबत चर्चा करण्याचा कोणताही विचार नाही. गरज भासल्यास हे युद्ध दीर्घकाळ सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे."

इस्रायल आणि अमेरिकेवर इराणचा १७ वा हल्ला

इराणच्या 'आयआरजीसी' (IRGC) या लष्करी दलाने अमेरिका आणि इस्रायलवर १७ व्यांदा मोठे हल्ले केले आहेत. इस्रायल आणि अमेरिकेने आधी इराणवर हल्ले केले होते, त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराणच्या भूदलाने तीन मोठ्या मोहिमा राबवल्याची माहिती 'प्रेस टीव्ही'ने दिली आहे.

Iran US war
Iran Israel Conflict Petrol Crisis: इराण-इस्रायल संघर्ष; अफवांचा बाजार गरम, परभणीत इंधनासाठी झुंबड

'ऑपरेशन ट्रू प्रॉमिज 4' ची मोठी कारवाई

इराणच्या लष्कराने (IRGC) स्‍पष्‍ट केले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणने शत्रूच्या ठिकाणांवर २३० हून अधिक स्फोटक ड्रोन्स डागले आहेत. इराणने प्रामुख्याने कुवेत आणि एरबिलमधील अमेरिकन लष्करी तळांना, तसेच उत्तर इराकमधील दहशतवादी केंद्रांना लक्ष्य केले आहे. इराणच्या दाव्यानुसार, त्यांनी बहरीनमधील अमेरिकेचा एक मुख्य हवाई तळ आणि त्यांचे नियंत्रण केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.युद्धाच्या पहिल्या दोन दिवसांत अमेरिकेचे ६८० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.

Iran US war
Israel Iran Conflict PM Modi: इस्त्रायलच्या दौऱ्यावर असताना मोदींना इराण हल्ल्याची कल्पना होती... राजदूतांनी काय सांगितलं?

इस्रायली संस्थेवर सायबर हल्ला

दरम्यान, पॅलेस्टाईन समर्थक 'हंडाला' हॅकिंग ग्रुपने इस्रायलच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल सिक्युरिटी स्टडीज'चा (INSS) डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. यामध्ये अत्यंत गोपनीय कागदपत्रे, रेकॉर्डिंग्ज आणि बुलेटिन लवकरच सार्वजनिक केली जातील, असे हॅकर्सनी म्हटले आहे.

Iran US war
Iran Israel US War: इराणचा अमेरिका-इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला; संघर्ष तिसऱ्या महायुद्धाकडे?

दिवंगत खामेनींना आज निरोप

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतौल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावर आज (दि. ५) रात्री तेहरानमधील इमाम खोमेनी प्रार्थना स्थळावर अंत्यसंस्कारापूर्वीचा विधी पार पडणार आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून, अंत्ययात्रेचा अंतिम मार्ग लवकरच जाहीर केला जाईल, असे सरकारी प्रसारमाध्यमांनी म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news