मुंबई : कोरोनामुळे MCA कार्यालय तीन दिवस बंद, BCCI मध्येही काहींना लागण | पुढारी

मुंबई : कोरोनामुळे MCA कार्यालय तीन दिवस बंद, BCCI मध्येही काहींना लागण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) १५ स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एमसीएचे कार्यालय पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) कार्यालयात देखील काहींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. बीसीसीआयचे मुख्यालय वानखेडे स्टेडियम परिसरात आहे.

मिळालेली माहिती अशी की, स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने आम्ही शुक्रवारपासून तीन दिवस कार्यालय बंद ठेवले आहे, असे एमसीए सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बीसीसीआयमध्ये देखील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ९० टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत तर, कार्यालयातील कर्मचारी संख्या कमी अहे. पण, कार्यालय अजूनही सुरू आहे, असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले.

Back to top button