संतापजनक : चोरीच्‍या संशयावरुन चार महिलांना रस्‍त्‍यावर केले विवस्‍त्र | पुढारी

संतापजनक : चोरीच्‍या संशयावरुन चार महिलांना रस्‍त्‍यावर केले विवस्‍त्र

इस्‍लामाबाद ; पुढारी ऑनलाईन : पाकिस्‍तानमधील कौर्याची परिसीमा गाठणार्‍या घटनांचे सत्र सुरुच आहे. श्रीलंकेच्‍या नागरिकाला जिवंत जाळण्‍याची घटना ताजी असतानाच मानवतेला काळीमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे. चोरीच्‍या संशयावरुन चार महिलांना रस्‍त्‍यावर केले विवस्‍त्र करुन त्‍यांच्‍याशी गैरवर्तन केल्‍याचा संतापजनक प्रकार पंजाब प्रांतातील फैसलाबाद येथे घडला आहे.

फैसलाबादमधील बाजारात महिला कचरा गोळा करण्‍यासाठी गेल्‍या होत्‍या. यावेळी त्‍यांना तहान लागली. एका इलेक्‍ट्रिक दुकानात जावून त्‍यांनी पाण्‍याची बाटली मागितली. यावेळी दुकानदाराने सर्व महिला चोरटा असल्‍याचे सांगत त्‍यांना मारहाण करण्‍यास सुरुवात केली. काही क्षणातच जमाव जमला. पिसाटलेल्‍या जमावाने चार महिलांना विवस्‍त्र केले. चौघीही आक्रोश करत होत्‍या; पण बेभान झालेल्‍या जमावाने त्‍यांना बेदम मारहाण केली. नग्‍न अवस्‍थेतच त्‍यांना रस्‍त्‍यावरुन त्‍यांची धिंड काढली. एक तासांमध्‍ये अधिक काळ हा सर्व प्रकार सुरु होता.

अत्‍याच्‍याराचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर

या संतापजनक घटनेचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाी दखल घेतली. या प्रकरणी पंजाब पोलिसचे प्रवक्‍ते म्‍हणाले की, याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आले असून सर्वांना अटक करण्‍यात आली आहे.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button