Omicron variant : ओमायक्रॉन 'अति सौम्य' स्वरुपाचा, घाबरु नका, डब्ल्यूएचओ तज्ज्ञांचे मत - पुढारी

Omicron variant : ओमायक्रॉन 'अति सौम्य' स्वरुपाचा, घाबरु नका, डब्ल्यूएचओ तज्ज्ञांचे मत

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं (Omicron variant) जगभरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केलीय. या व्हेरियंटच्या धास्तीने अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांवर निर्बंध घातलेत. अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलाय. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी, ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे घाबरण्याचे कारण नसून हा अति सौम्य स्वरुपाचा (super mild) व्हेरियंट असल्याचे म्हटलंय.

दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या मते, नव्या व्हेरियंटची लक्षणे डेल्टा व्हेरियंट सारखी धोकादायक नाहीत. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अद्याप मृत्यू अथवा कोणीही गंभीर आजारी झाल्याचे आढळून आलेले नाही. यावरुन नवा व्हेरियंटची समस्या गंभीर स्वरुपाची नसल्याचे संकेत मिळत आहेत.

आतापर्यंत आढळून आलेली ओमिक्रॉनची (Omicron variant) प्रकरणे ही गंभीर नसून सौम्य स्वरुपाची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. देशांनी विमान प्रवासांवर निर्बंध घालू नयेत. कारण किरकोळ घटनांवरुन असा निर्णय घेणे अनावश्यक आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

डब्ल्यूएचओचे युरोपमधील वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी डॉ कॅथरीन स्मॉलवूड यांनी म्हटले आहे, ”अशा प्रकारच्या उपायांबद्दल आम्ही शिफारसी केलेल्या नाहीत. डब्ल्यूएचओचे आणखी एक तज्ज्ञ आणि आफ्रिकेतील प्रादेशिक संचालक डॉ. मॅत्शिदिसो मोटी यांनी, देशांनी विमान प्रवासांवर निर्बंध घालू नयेत अशी विनंती केली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की अशा प्रकारांच्या मर्यादांमुळे नवा व्हेरियंट फैलावण्यास मदत होऊ शकते, तसेच याचा अर्थव्यवस्था आणि लोकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊ शकतो.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Omicron Corona जाणून घ्या सर्व माहिती? डॉ. रमण गंगाखेडकर | All you need to know about Omicron Corona

Back to top button