Lakhbir Singh Rode : खलिस्तानची मागणी करणाऱ्या भिंद्रनवालेच्या पुतण्याचा पाकिस्तानात अंत | पुढारी

Lakhbir Singh Rode : खलिस्तानची मागणी करणाऱ्या भिंद्रनवालेच्या पुतण्याचा पाकिस्तानात अंत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानात लपलेला आणखी एक खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) लखबीर सिंग रोडे (Lakhbir Singh Rode) याचा मृत्यू झाला. लखबीर सिंग हा जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचा पुतण्या होता. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून पंजाबमध्ये भारताविरुद्धच्या खलिस्तानी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. भारताने त्याला युएपीए अंतर्गत वाँटेड दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानात प्रतिबंधित खलिस्तानी संघटना खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचा तो प्रमुख होता. (Lakhbir Singh Rode)

संबंधित बातम्या : 

खलिस्तानच्या मागणीवरून ८० च्या दशकात पंजाबध्ये हिंसाचार पसरवणाऱ्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या लखबीर सिंग रोडे पाकिस्तानात पळून गेला होता. लखबीर सिंग याचा २ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याची माहिती फुटू नये म्हणून लखबीर याच्यावर पाकिस्तानात शीख प्रथेनुसार गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. लखबीर सिंग रोडे हे ७२ वर्षाचे होते. भारतातून पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानात राहत होता. जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा रोडे गावचा रहिवासी होता. लखबीर सिंगने आपल्या नावासोबत गावाचे नाव जोडले होते. (Lakhbir Singh Rode)

या वर्षात आतापर्यंत दोन खलिस्तान्यांचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. ६ मे २०२३ रोजी खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजावार याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तो खलिस्तानी कमांडो फोर्स नावाची संघटना चालवत होता. याशिवाय पाकिस्तानमध्ये लष्कराचे अनेक दहशतवादीही मारले गेले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button