पाकिस्तानात महागाईचा कळस; देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

पाकिस्तानात महागाईचा कळस; देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
Published on
Updated on

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : भयावह आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानात महागाईने कळस गाठला असून त्यामुळे तेथील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. लागोपाठ दुसर्‍या आठवड्यात तेथील महागाई दर 40 टक्क्यांच्या वर कायम आहे. गॅसच्या वाढत्या किमतीमुळे ही वाढ नोंदवण्यात आली आहे. परिणामी, हा देश सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आल्याचे दिसून येते.पाकिस्तान

ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील महागाई दर 41.13 टक्के नोंदवला गेला. गेल्या वर्षभरात या देशात गॅसच्या किमती 1,100 रुपयांनी वाढल्या आहेत. गॅसशिवाय खाद्यपदार्थांच्या किमती झपाट्याने वाढत चालल्या आहेत. पिठाच्या किमतीत तब्बल 88.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय बासमती तांदूळ 76.6 टक्के, साधा तांदूळ 62.3 टक्के, चहा पावडर 53 टक्के, लाल तिखट 81.70 टक्के, गूळ 50.8 टक्के आणि बटाटे 47.9 टक्क्यांनी महागले आहेत. गेल्या वर्षभरात देशात कांद्याचे दर 36.2 टक्के, टोमॅटो 18.1 टक्के, मोहरीचे 4 टक्के आणि वनस्पती तेलाचे भाव 2.90 टक्क्यांनी वाढले आहेत.

देशातील अल्पकालीन चलनवाढीने गेल्या आठवड्यात 10 टक्क्यांनी झेप घेतली आहे. 17 प्रमुख शहरांत 50 बाजारांतील 51 जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा समावेश करून ही आकडेवारी तयार केल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत 18 जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

महागाईचा दर चढाच

मे 2023 पासून पाकिस्तानातील महागाई दरात घट नोंदवली गेली. ऑगस्टमध्ये तो 24.40 टक्क्यांपर्यंत घसरला. तथापि यानंतर पुन्हा एकदा महागाई वाढत चालली आहे. दीर्घकाळापासून हा देश आर्थिक संकटाशी झुंजत असून आता तर तिथे दिवाळखोरीचा धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news