Richest Country : अमेरिकेला पिछाडीवर टाकत चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश | पुढारी

Richest Country : अमेरिकेला पिछाडीवर टाकत चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश

बीजिंग : पुढारी ऑनलाईन

आजवर जगातील सर्वात श्रीमंत देश असे बिरुद अमेरिका मिरवत होते. मात्र आता ही ओळख पुसली गेली आहे. अमेरिकेला पिछाडीवर टाकत चीन हा जगातील सर्वात श्रीमंत देश ( Richest Country ) बनला आहे. चीनने अवघ्‍या २० वर्षांमध्‍ये ही मजल मारली आहे.

Richest Country : दोन दशकांमध्‍ये चीनच्‍या संपत्तीत तिप्‍पट वाढ

मागील दोन दशकांमध्‍ये चीनच्‍या संपत्तीत तब्‍बल तिप्पट वाढ झाली आहे. सध्‍या जगातील एक तृतीयांश संपत्ती ही चीनजवळ आहे. व्‍यवस्‍थापनामधील सल्‍लागार कंपनी अशी ओळख असणार्‍या मॅकिन्‍से अँड कंपनीने आपल्‍या अहवालात ही माहिती दिली आहे.

मॅकिन्‍से अँड कंपनीच्‍या अहवालानुसार, चीन हा जागतिक व्‍यापार संघटनेमध्‍ये सहभागी होण्‍यापूर्वी एक वर्ष आधी म्‍हणजे २०००मध्‍ये चीनची संपत्ती ही सात खरब डॉलर इतकी होती. ती आता १२३ खरब डॉलर एवढी झाली आहे. चीनच्‍या आर्थिक विकासात सातत्‍याने वाढ होत आहे. मागील २० वर्षांमध्‍ये संपत्ती निर्मितीपैकी एक तृतीयांश वाटा हा चीनचाच आहे. मॅकिन्‍से अँड कंपनीने जगातील ६० टक्‍के लोकसंख्‍या असणार्‍या १० देशांच्‍या आर्थिक स्‍थितीचा आढावा घेतला. यामध्‍ये स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, वर्ष २००० मध्‍ये जगाची संपत्ती ही १५६ ट्रिलियन डॉलर होती. २०२० मध्‍ये ही संपत्ती ५१४ ट्रिलियन डॉलर एवढी झाली आहे.

या कारणामुळे अमेरिकेचा क्रमांक घसरला

अमेरिकेच्‍या संपत्तीमध्‍येही वाढ झाली आहे. मागील २० वर्षांमध्‍ये अमेरिकेच्‍या संपत्तीमध्‍ये दुप्‍पट वाढ झाली आहे. २०००साली अमेरिकेची संपत्ती ही ९० खरब डॉलर होती. अहवालातील निरीक्षणानुसार, मागील काही वर्षांत देशातील मालमत्तेच्‍या किंमतींवर वाढ झाली नसल्‍याने अमेरिका श्रीमंत देशांच्‍या यादीत दुसर्‍या स्‍थानवर फेकला गेला आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button