Israel Hamas War : लेबनानच्या हिजबुल्लाहचा इस्रायलवर हल्ला; युद्ध चिघळले | पुढारी

Israel Hamas War : लेबनानच्या हिजबुल्लाहचा इस्रायलवर हल्ला; युद्ध चिघळले

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेबनानच्या हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला केला आहे. युद्ध शमण्याचे नाव न घेता चिघळू लागले आहे. हमाससोबत संघर्ष सुरु असताना लेबनानने हल्ला सुरु केल्याने इस्रायलची चिंता वाढली होती. दरम्यान, आता हिजबुल्लाहकडूनही इस्रायलला लक्ष्य करण्यात आले आहे.

“लेबनानमधून इस्रायलच्या हद्दीत ९ रॉकेट डागण्यात आले. आयडीएफ एरियल डिफेन्स अॅरेने प्रोटोकॉलनुसार ५ रॉकेट रोखले. इस्रायल डिफेंन्स फोर्स (IDF) सध्या लेबनानमधील लॉन्च साइटवर हल्ला करत आहे”, असा इशारा इस्रायलकडून देण्यात आला आहे. इस्रायल डिफेंन्स फोर्सच्या अधिकृत ट्वीटर अकांऊटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

प्राणघातक घुसखोरीनंतर हमासचे नेतृत्व नष्ट करण्याचा प्रयत्न इस्रायलकडून सुरु आहे. इस्रायलच्या आक्रमण होण्यापूर्वी गाझा पट्टीमध्ये दहा लाखांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेले हे युद्ध दोन्ही बाजूंसाठी पाच गाझा युद्धांपैकी सर्वात घातक ठरले आहे. ज्यामध्ये 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button