Israel Hamas War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन उद्या इस्रायलला भेट देणार | पुढारी

Israel Hamas War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन उद्या इस्रायलला भेट देणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-हमास युद्धादरम्यान (Israel Hamas War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) बुधवारी (दि.१८) इस्रायलमधील तेल अवीवला भेट देणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी ही माहिती दिली. मंगळवारी पहाटे तेल अवीवमध्ये माध्यमांना संबोधित करताना ब्लिंकेन म्हणाले की, इस्रायल, मध्य पूर्व आणि जगासाठी हा अतिशय महत्वाचा क्षण आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन बुधवारी इस्रायलला भेट देणार आहेत.

संबंधित बातम्या : 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, अँटोनी ब्लिंकन यांनी सांगितले की, “इस्रायलशी अमेरिकेच्या एकजुटीची पुष्टी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन तेल अवीव येथे येतील. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन पुन्हा स्पष्ट करतील की इस्रायलला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा आणि हमास आणि इतर दहशतवादी संघटनांकडून होणारे हल्ले थांबवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी असेही सांगितले की अमेरिका आणि इस्रायलने एक यंत्रणा तयार करण्यास सहमती दर्शविली आहे ज्यामुळे इतर देश आणि बहुपक्षीय संस्था गाझामधील नागरिकांना मानवतावादी मदत पोहोचवू शकतील. जे देश या संकटाचा फायदा घेऊन इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना तसे करू नका, असे आवाहन बायडेन करणार आहेत. हमासने ओलीस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी बायडेन अमेरिकेच्या भागीदारांशी समन्वय साधत राहतील, असेही ब्लिंकन यांनी सांगितले. (Israel Hamas War)

हेही वाचा : 

 

Back to top button