India and US Meet | अमेरिकेचा ट्रूडोंना धक्का! भारत-अमेरिका बैठकीत निज्जर हत्येबाबत कोणतीही चर्चा नाही | पुढारी

India and US Meet | अमेरिकेचा ट्रूडोंना धक्का! भारत-अमेरिका बैठकीत निज्जर हत्येबाबत कोणतीही चर्चा नाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी (दि.२८) वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, मात्र अमेरिकेने निज्जर यांच्या हत्येबाबत एस. जयशंकर यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अमेरिका भारतासोबतच्या बैठकीत खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करेल, असा विश्वास दाखवला होता. परंतु , अमेरिकेने कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांना निज्जर यांच्या हत्येचा मुद्दा दुर्लक्षित करत कॅनडाला मोठा धक्का दिला आहे. India and US Meet)

संबंधित बातम्या:

कॅनडाचे पंतप्रधान ट्रूड्रो यांनी अमेरिकेला परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत निज्जर हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले होते. तसेच अमेरिका आमच्यासोबतच असल्याचा दावा करत, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी होणाऱ्या बैठकीत निज्जर यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करतील, असा विश्वास व्यक्त केला होता. पण अमेरिकेने बैठकीत भारत- कॅनडा वादावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. (India and U.S Meet)

India and US Meet : भारत-अमेरिका परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारतीय परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांच्यातील बैठकीत जी -20 परिषदेतून काय साध्य झाले. तसेच भारत आणि मध्य पूर्वेदरम्यान बांधण्यात येणारा आर्थिक कॉरिडॉर या मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रसारमाध्यमांशी बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी G20 परिषदेत केलेल्या सहकार्याबद्दल अमेरिकेचे आभार मानले. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले की, दोघांमध्ये चांगली चर्चा झाली, ज्यामध्ये जी-20 परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासभेव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली. माध्यमांना दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे या दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कॅनडा वादावर दोन्ही बाजूंनी मौन पाळले, असल्याचे दिसून आले.

हेही वाचा:

 

Back to top button