Canadian Army website hacked : कॅनडा एअरफोर्सची वेबसाइट केली तात्‍पुरती हॅक : ‘इंडियन सायबर फोर्स’चा दावा | पुढारी

Canadian Army website hacked : कॅनडा एअरफोर्सची वेबसाइट केली तात्‍पुरती हॅक : 'इंडियन सायबर फोर्स'चा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडा  एअरफोर्सची ( हवाई दल) अधिकृत वेबसाइट  बुधवारी (दि. २७)  काही काळासाठी हॅक केल्याचा दावा ‘इंडियन सायबर फोर्स’ नावाच्या हॅकर्स गटाने केला आहे.

यासंदर्भात ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार,  Indian Cyber Force या हॅकर्सकडून एक्स या सोशल मीडियावर कॅनडियन लष्कराची वेबसाईट काही काळ हॅक केल्याची पोस्ट केली केली आहे.

‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘इंडियन सायबर फोर्स’ नावाच्या हॅकर्सच्या गटाने कॅनडाच्‍या लष्‍कराची वेबसाइट तात्‍पुरती हॅक केली. या सायबर हल्ल्याची जबाबदारी X (पूर्वीचे ट्विटर) वर घेतली होती. कॅनडाच्‍या राष्ट्रीय संरक्षण विभागातील माध्‍यम संपर्क प्रमुख डॅनियल ले बुथिलियर यांनी द ग्लोब आणि मेलला सांगितले की, काही काळासाठी व्‍यत्‍यय आला होता. मात्र नंतर सर्व काही सुरळीत झाले.

भारतीय सायबर फोर्सने X वर केलेल्‍या पोस्टमध्ये म्‍हटले आहे की  “कॅनेडियन एअरफोर्स वेबसाइट हॅक केली आहे. तसेच या वेबसाइटवर त्रुटी संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर केला. . दरम्‍यान कॅनडा नौदल, विशेष कमांड गट, हवाई आणि अंतराळ ऑपरेशन्ससह कॅनडातील सर्व लष्करी ऑपरेशन्स समाविष्ट करणारे कॅनेडियन फोर्स सध्या याची चौकशी करत आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मागील आठवड्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूप्रकरणी भारतावर आरोप केले होते. यानंतर ‘इंडियन सायबर फोर्स’ यापूर्वी २१ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या सायबर स्पेसवरील हल्ल्याची इशारा सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून दिला होता.

Back to top button