‘कोरोना विषाणू’सारख्या आणखी एका आजाराची चाहूल; चीनमधील शास्त्रज्ञाचा इशारा | पुढारी

'कोरोना विषाणू'सारख्या आणखी एका आजाराची चाहूल; चीनमधील शास्त्रज्ञाचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना व्हायरस सारख्या आजारातून बाहेर पडल्यानंतर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडलेला होता. या आजारामुळे जगभरातील आर्थिक स्थिती कोलमडलेली होती. आता या आजारानंतर आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे कोरोना व्हायरस सारखा आणखी आजार भविष्यात येऊ शकतो असा इशारा शी झेंगली या शास्त्रज्ञाने दिलेला आहे.

चीनमधील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली, यांना ‘बॅटवुमन’ या नावाने देखील ओळखले जाते. झेंगली या प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या एका शोधनिबंधात भविष्यात आणखी एक कोरोनाव्हायरसचा उद्रेक येण्याची दाट शक्यता आहे, असा इशारा दिलेला आहे.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या झेंगली आणि त्यांच्या टीमने, 40 कोरोनाव्हायरस प्रजातींच्या मानवी समुहाचे परीक्षण केल्यानंतर निम्म्या लोकांना अत्यंत धोकादायक म्हणून चिन्हांकित केले. यापैकी सहा आजारांमुळे त्यांच्यावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, यापैकी तीन कोरोनाव्हायरसमुळे आणि काहींना इतर प्राण्यांच्या प्रजातींपासून संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे.

विषाणू शास्त्रज्ञ बॅटवुमन यांचा शोधनिबंध

झेंगली यांचे संशोधन हे लोकसंख्या, अनुवांशिक विविधता, यजमान प्रजाती आणि झुनोसिसची पार्श्वभूमी यासह विविध विषाणू वैशिष्ट्यांच्या विश्लेषणावर आधारित होते. यावरून प्राण्यांपासून मानवांना उद्भवू शकणाऱ्या आजाराविषयी संशोधन करण्यात आलेले आहे.

कोविड-19 साथीच्या रोगाचा अनुभव पाहता जगाने नविन आजारांना सामोरे जाण्यासाठी सज्ज रहायला हवं अशी स्थिती गेल्या तीन वर्षांमध्ये झाली आहे. कोविड-19 आजाराने अनेक लोकांचा बळी घेतला. ‘बॅटवुमन’ ने असेही नमूद केले की “जर एखाद्या कोरोनाव्हायरस सारखा आणखी एक रोग उद्भवला तर भविष्यात त्याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे”. त्यांच्या या इशाऱ्यानंतर कोरोनाव्हायरस आजारासारख्या भविष्यातील नव्या आजाराविषयी आता चर्चा आहे.

Back to top button