कॅनडाला जशास तसे उत्तर : भारताने कॅनडाच्या नागरिकांचा व्हिसा रोखला | पुढारी

कॅनडाला जशास तसे उत्तर : भारताने कॅनडाच्या नागरिकांचा व्हिसा रोखला

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारने कॅनडाच्या नागरिकांचा व्हिसा अनिश्चित काळासाठी रोखला आहे. दरम्यान कॅनडाने त्यांच्या भारतातील दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या सीमित केली जात असल्याचे म्हटले आहे. (India suspends visa for Canadians)

संबंधित बातम्या

कॅनडातील खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर भारत आणि कॅनडातील संबंध कमालीचे ताणले आहेत. एकमेकांच्या राजदूतांची दोन्ही देशांनी हकालपट्टी केली आहे.
कॅनडात बीएलएस इंटरनॅशनल ही संस्था कॅनडातील नागरिकांना भारतीय व्हिसा मिळवून देण्याचे काम पाहाते. या संस्थेच्या वेबसाईटवर २१ सप्टेंबरपासून भारतीय व्हिसा मिळणार नाही असे म्हटले आहे. या संदर्भात भारताच्या परराष्ट्र खात्याच्या वेबसाईटवर कोणतीही अधिकृत माहिती मात्र देण्यात आलेली नाही. (India suspends visa for Canadians)

एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मात्र कॅनडातील नागरिकांसाठी भारतीय व्हिसा स्थगित करण्यात आल्याच्या वृत्ताला दिजोरा दिल्याचे हिंदुस्थान टाइम्सने म्हटले आहे. कोरानाच्या साथीनंतर भारताने व्हिसा स्थगित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारताने कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थी यांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भारताने पुढचे पाऊल उचलले आहे. (India suspends visa for Canadians)

शिख फॉर जस्टीस या संघटनेत निज्जर प्रमुख व्यक्ती होता. काही महिन्यांपूर्वी त्याची एका गुरुद्वारा बाहेर हत्या झाली.
कॅनडाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने कॅनडाच्या भारतातील दूतावासातील कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर धमक्या येत आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर दूतावासातील कर्मचारी सीमित केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. कॅनडाने भारताकडे दूतावासाती जास्तीची सुरक्षा मिळावी अशी मागणीही केली आहे.

दरम्यान शिख फॉर जस्टीस या संघटनेने “Kill Indians” असे पोस्टर झळकवले होते, त्यानंतर कॅनडातील भारतीय दूतावासात सुरक्षा वाढण्यात आली आहे. शिख फॉर जस्टीस या संघटनेवर भारताने २०१९पासून बंदी घातली आहे.

हेही वाचा

Back to top button