देशहित सर्वोपरि : कॅनडाविरुद्ध केंद्राच्‍या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा | पुढारी

देशहित सर्वोपरि : कॅनडाविरुद्ध केंद्राच्‍या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यू प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले आहे. तसेच कॅनडाने भारतीय राजदुतांवरही कारवाई केली. याला कारवाईला भारतानेही सडेतोड प्रत्‍युत्तर दिले आहे. केंद्र सरकारच्‍या या कारवाईस काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. देशाचे हित हे सर्वोच्‍च असल्‍याचे पक्षाचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांनी म्‍हटले आहे.

जयराम रमेश यांनी X (पूर्वीचे ट्विटर ) वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “दहशतवादाविरुद्ध आपल्या देशाच्‍या लढाईत कोणतीही तडजोड करता कामा नये. देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करतो तेव्हा देशहित हे सर्वोपरि ठेवल्या पाहिजेत, असे काँग्रेस पक्ष मानतो.” दरम्‍यान, काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांवर टीका केली आहे. भारतविरोधी प्रचारक म्हणून भारतासाठी धोकादायक, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

भारताने ट्रुडो यांचे आरोप फेटाळले

भारतीय सरकारी एजंट आणि निज्जर यांच्या हत्येमध्ये “संभाव्य दुवा” असू शकतो, असे जस्टिन ट्रुडो यांचे म्हणणे भारताने पूर्णपणे फेटाळला आहे. ट्रुडो याचा दावा “निराधार” आणि “प्रेरित” असल्‍याचे म्‍हटले आहे.
जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत वक्तव्य केल्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानिया जोली यांनी एका उच्च भारतीय राजदूताची देशातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली. जोली यांच्या कार्यालयाने म्‍हटले की, ज्या मुत्सद्दी व्यक्तीची हकालपट्टी करण्यात आली ते पवन कुमार राय हे रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे (रॉ) प्रमुख आहेत.

भारतानेही दिले सडेतोड प्रयुत्तर

एका भारतीय अधिकाऱ्याची कॅनडातून हकालपट्टी करण्‍याचा निर्णय झाल्‍यानंतर भारतानेही तत्‍काळ कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांना औपचारिकपणे बोलावण्यात आले आणि एका वरिष्ठ कॅनडाच्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल त्यांना सूचित करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की “आमच्या अंतर्गत बाबींमध्ये कॅनेडियन मुत्सद्दींचा हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग” याविषयी नवी दिल्लीची वाढती भीती व्यक्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.ए

हेही वाचा :

 

 

Back to top button