‘त्या’ भारतीय अधिकार्‍याचे नावही कॅनडाने केले लीक

‘त्या’ भारतीय अधिकार्‍याचे नावही कॅनडाने केले लीक

टोरँटो/नवी दिल्ली वृत्तसंस्था : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येचा आरोप 'रॉ' या भारतीय यंत्रणेवर ठेवला होता. आता कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाने निज्जरचा खात्मा 'रॉ अधिकारी पवनकुमार राय यांनी केल्याचेही लीक केले आहे. राय हे कॅनडामध्ये 'रॉ'साठी काम करत होते. राय कॅनडातून भारतात परतले आहेत. राय यांच्यासाठी विशेष सुरक्षेची तजवीज भारत सरकारकडून केली जात आहे.

राय हे 1997 च्या बॅचचे पोलिस सेवेतील पंजाब कॅडरचे अधिकारी आहेत. राय यांनी 2009-10 मध्ये पंजाबात ड्रग्जविरोधात कारवाईचा सपाटा लावला होता. तेव्हा पंजाबातील नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलिना जॉली यांनी निज्जरच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news