भारतात गुन्हे, अन् कॅनडामध्ये आश्रय!

भारतात गुन्हे, अन् कॅनडामध्ये आश्रय!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कॅनडा-भारत तणावादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) भारतात गुन्हे करून कॅनडात आश्रयाला असलेल्या 11 गुंड व दहशतवाद्यांची यादी जारी केली आहे.

गँगस्टर गोल्डी ब्रारचे नावही या यादीत आहे. त्याने पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली होती. तुरुंगातील गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याचेही नाव यादीत आहे. शिवाय अर्शदीप सिंग गिल ऊर्फ अर्श डल्ला, दरमन सिंग काहलॉन, लखबीर सिंग, दिनेश शर्मा ऊर्फ गांधी, नीरज ऊर्फ पंडित, गुरपिंदर, सुखदुल, गौरव पटियाल ऊर्फ सौरभ गँगस्टर दलेर सिंग या गुंड तसेच दहशतवाद्यांची नावेही आहेत.

शीख फॉर जस्टीस, खलिस्तान टायगर फोर्स, वर्ल्ड शीख संघटना, बब्बर खालसा इंटरनॅशनल आदी 9 दहशतवादी संघटना कॅनडाच्या भूमीत भारतविरोधी कामे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news