Heaviest Animal | हा प्राणी ठरु शकतो सर्वात वजनदार; तब्बल ३० हत्तींएवढे वजन! | पुढारी

Heaviest Animal | हा प्राणी ठरु शकतो सर्वात वजनदार; तब्बल ३० हत्तींएवढे वजन!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आत्तापर्यंत ब्लू व्हेल हा जगातील सर्वात वजनदार जलचर मानला जात होता, परंतु शास्त्रज्ञांनी नुकतचं एका प्राण्याचा सांगाडा शोधून काढला आहे जो ब्लू व्हेलपेक्षा जड आहे. त्याचे वजन 30 आफ्रिकन जंगली हत्ती आणि 5000 पुरुषांइतके असावे. अंदाजे वजन  340 टनांपर्यंत असू शकते.  या शोधून काढलेल्या प्राण्याची चर्चा होवू लागली आहे. शास्त्रज्ञांनी या प्राण्याचे नाव  पेरुसेटस कोलोसस (Perusetus Colossus) असे ठेवले आहे. (Heaviest Animal)

सर्वात वजनदार प्राणी असू शकतो

पेरूमध्ये संशोधकांना नुकताच सापडलेला एक महाकाय प्राचीन व्हेलआतापर्यंतच्या सर्वात वजनदार प्राणी असू शकतो. अंदाजे 39 दशलक्ष वर्षांपूर्वी ते येथे वास्तव्य करत असावेत. जर्नल नेचरमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, नामशेष झालेल्या पेरुसेटस कोलोसस व्हेलचे अंदाजे वजन 85 ते 340 मेट्रिक टन ( अंदाजे 187,393 ते 749,572 पौंड) होते. पेरुसेटसचे वजन निळ्या व्हेलपेक्षा दोन ते तीन पट जास्त होते, जे आज जास्तीत जास्त १४९.६ मेट्रिक टन आहे. नेचर या जर्नलमध्ये बुधवारी (दि.२) प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे पहिले लेखक जियोव्हानी बियानुची यांनी ही माहिती दिली आहे.

जर्मनीतील स्टेट म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री स्टुटगार्ट येथील संशोधक डॉ. एली इमसन यांनी या प्राण्याविषयी माहिती दिली आहे. प्राण्याची एकूण अठरा हाडे सापडल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की हा व्हेलचा प्रारंभिक प्रकार आहे, ज्याला बॅसिलोसॉरिड म्हणून ओळखले जाते.

Heaviest Animal : किती जड आहे?

इटलीतील पिसा विद्यापीठातील पृथ्वी विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक बियानुची यांनी सीएनएन या वृत्तसंस्थेला सांगितले की,” “पेरुसेटसचे वजन दोन निळ्या व्हेल, तीन अर्जेंटिनोसॉर (एक विशाल सॉरोपॉड डायनासोर), 30 हून अधिक आफ्रिकन वन्य हत्ती आणि 5,000 हून अधिक लोकांइतके असेल,” ते पुढे असेही म्हणाले की, पेरुसेटसची हाडे ‘अत्यंत जाड’ होती. सांगाड्याचा इतका जडपणा कोणत्याही जिवंत सिटेशियनमध्ये आढळत नाही. “पेरुसेटसचे प्रचंड अवशेष वस्तूमान सूचित करते की उत्क्रांती आपल्या कल्पनेच्या पलीकडचे प्राणी निर्माण करू शकते,”

हेही वाचा 

Back to top button