Sweden Russian Spy Whale : रशियन ‘गुप्तहेर’ व्हेल माशाचा स्वीडनमध्ये धुमाकूळ; समुद्र किनाऱ्यावर रेड अलर्ट | पुढारी

Sweden Russian Spy Whale : रशियन 'गुप्तहेर' व्हेल माशाचा स्वीडनमध्ये धुमाकूळ; समुद्र किनाऱ्यावर रेड अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या एक बेलुगा व्हेल मासा खूप चर्चेत आहे. स्वीडनच्या (Sweden) किनाऱ्यावर हा मासा आढळून आला आहे. हा बेलुगा व्हेल (Beluga Whale) मासा रशियन ‘स्पाय’ (Russian Spy) असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गुप्तहेर माशामुळे स्वीडनमधील प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे.

स्विडनमध्ये सापडलेल्या व्हेल माशाचे (Sweden Whale) १३-१४ वर्ष वय असल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी स्वीडनची नैऋत्य किनारपट्टी ह्वेनबोस्ट्रँड येथे हा व्हेल मासा दिसला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, चर्चेत असणाऱ्या या बेलुगा व्हेल माशाला रशियन नौदलाने हेर म्हणून प्रशिक्षण दिले आहे. या माशावर “इक्विपमेंट सेंट पीटर्सबर्ग” असे शब्द छापलेला एक आहे. त्याचबरोबर कथित रशियन स्पाय (Russian Spy)  व्हेलमध्ये कॅमेरा असल्याचे देखील सांगितले आहे.

हा मासा याआधी नॉर्वेमध्ये आढळून आलेला होता. त्यामुळे नॉर्वेने आपल्या नागरिकांना या रशियन हेर व्हेलपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. हा व्हेल मासा गुप्तहेर असल्याच्या आरोपांवर रशियाने अद्यापही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. हा मासा सापडल्याची व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. (Video on Twitter)

२०१९ मध्ये पहिल्यांदा सापडला होता हाच व्हेल मासा | Sweden Russian Spy Whale

चार वर्षांपूर्वी एप्रिल २०१९ मध्ये उत्तर नॉर्वेजवळ हा व्हेल मासा पहिल्यांदा दिसला होता. नॉर्वेच्या फिनमार्क येथील सुदूर येथे हा मासा प्रथम आढळून आलेला होता. आता पुन्हा एकदा हा व्हेल मासा स्वीडनच्या किनाऱ्यावर आढळून आला आहे.

हेही वाचा

Back to top button