Sudan Army : 'या' इस्‍लामिक राष्‍ट्रात लष्‍कराचा उठाव, पंतप्रधानांना अटक - पुढारी

Sudan Army : 'या' इस्‍लामिक राष्‍ट्रात लष्‍कराचा उठाव, पंतप्रधानांना अटक

खार्टूम : पुढारी ऑनलाईन

सुदानमध्‍ये लष्‍कराने ( Sudan Army ) पंतप्रधान अब्‍दल्‍ला हमदोक यांना अटक करुन सत्ता काबीज केली आहे. या घटनेच्‍या निषेधार्थ सुदानमधील हजारो नागरिक रस्‍त्‍यावर उतरले आहेत. सुरक्षा दलाने केलेल्‍या गोळीबारात तीन नागरिक ठार झाले तर ८०हून अधिक जण जखमी झाले आहेत.

सुदान लष्‍कराने ( Sudan Army ) २५ ऑक्‍टोबर रोजी हमदोक यांचे सरकार बरखास्‍त केले. देशातील इंटरनेटसेवा बंद करत आणीबाणी जाहीर केली आहे. जगभरातील लोकशाही राजवट असलेल्‍या देशांनी सुदानमधील घडामाेडींवर चिंता व्‍यक्‍त केली आहे. अमेरिकेने सुदान देत असलेली आर्थिक मदतही बंद केली आहे. सुदानमधील एका डॉक्‍टरांच्‍या समितीने माध्‍यमांना माहिती देताना सांगितले की, सुदानमध्‍ये लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार लष्‍कराने बरखास्‍त केले आहे. याकृतीचा संयुक्‍त राष्‍ट्रांसह अमेरिका आणि युरोपीय संघाने निषेध केला आहे.

अमेरिकेकडूनआर्थिक मदत तत्‍काळ बंद

सुदानमधील घडामोडींवर व्‍हाईट हाउसचे प्रवक्‍ता करीन पियरे यांनी म्‍हटलं आहे की, सुदानमधील लष्‍कर सत्ता काबीज करेल, असा इशारा अमेरिकेने वारंवार दिला होता. सुदान लष्‍कराने पंतप्रधान अब्‍दल्‍ला हमदोक यांच्‍यासह त्‍यांच्‍या सहकार्‍यांची तत्‍काळ सुटका करावी. अमेरिकेच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता नेड प्राइस यांनी म्‍हटलं आहे की, अमेरिका सुदानला ७० कोटी डॉलरची आर्थिक मदत करत होते. मात्र लष्‍कराने सत्ता ताब्‍यात घेतल्‍याने आम्‍ही ही आर्थिक मदत तत्‍काळ बंद करत आहोत.

सुदानचे लष्‍कर प्रमुख अब्‍देल फतह बुरहान यांनी टीव्‍हीवरुन राष्‍ट्राला संबोधित करत हमदोक यांचे सरकार बरखास्‍त करत असल्‍याची घोषणा केली. देशातील राजकीय पक्षांमधील संघर्षामुळे लष्‍काराला हस्‍तक्षेप करावा लागला. लवकरच देशात लोकशाही प्रक्रियेने सरकार स्‍थापन केले जाईल, असे आश्‍वासनही त्‍यांनी जनतेला दिले आहे.

( Sudan Army ) लष्‍कराच्‍या निषेधार्थ हजारो नागरिक रस्‍त्‍यावर

लष्‍कराच्‍या निषेधार्थ हजारो देशातील हजारो नागरिक रस्‍त्‍यावर उतरले आहे. राजधानी खार्टूम येथे नागरिकांनी चक्‍का जाम आंदोलन केले. काहींनी रस्‍त्‍यावर टायर पेटवून देत लष्‍कराच्‍या विरोधात जोरदार घोषणा दिल्‍या. या आंदोलनाचे व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाले आहेत.

सुडनीज प्रोफेशनल असोसिएशनसह सुदान कम्‍युनिस्‍ट पार्टीनेही लष्‍कराच्‍या कृतीचा तीव्र विरोध केला आहे. कामगारांनी संपावर जावे, असे आवाहन कम्‍युनिट पक्षाने केला आहे.

१९८९मध्‍ये अल-बशीरमध्‍ये यांनी लोकशाही मार्गाने आलेले सरकार हटवत सत्ता हस्‍तगत केली होती. २०१९ मध्‍ये जनतेने केलेल्‍या आंदोलनानंतर सुदानचे हुकूमशहा ओमर अल बशीर हे सत्तेतून पायउतार झाले होते. यानंतर लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार बरखास्‍त झाल्‍याने सुदानमध्‍ये पुन्‍हा लष्‍करी राजवटकडे सुरु झाल्‍याने अनेक देशांनी चिंता व्‍यक्‍त केली आहे. देशातील इंटरनेट सेवा बंद करण्‍यात आली आहे.

हेही वाचलं का?

 

 

 

Back to top button