Cyber Crime : सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलीची फसवणूक - पुढारी

Cyber Crime : सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलीची फसवणूक

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : इंस्टाग्रामवर बनावट (Cyber Crime) अकाउंट उघडून एका अल्पवयीन मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सायबर कलमांखाली एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.

गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील एका अल्पवयीन मुलाने त्याच्या ओळखीच्या अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीच्या नावाने इंस्टाग्रामवर (Cyber Crime) अकाउंट उघडले. यानंतर त्या मुलाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्यासोबत चॅटिंग करत त्या वेगवेगळे फोटो पाठवले.

दरम्यान चॅट करणारी मुलगी नसून मुलगा असल्याचे कळल्यानंतर याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलावर सायबर कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार करीत आहेत.

Back to top button